Home > मॅक्स किसान > महाराष्ट्रात पुन्हा गारपीट ? ; या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' आणि 'ऑरेंज अलर्ट'..

महाराष्ट्रात पुन्हा गारपीट ? ; या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' आणि 'ऑरेंज अलर्ट'..

राज्यात (Maharashtra)गेल्या काही दिवसांपासून हवामानात ( Climate) मोठा बदल होत आहे. कधी तीव्र ऊन (sunlight) तर कधी अवकाळी पाऊस मध्येच गारांचा पाऊस (hailstrom) अशा विरोधी परिस्थितीचा सामना शेतकर्‍यांना (farmer) करावा लागत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा सामना करावा लागला आता पून्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (IMD)वर्तविण्यात आली असून काही जिल्ह्यांना येलो(yellow) तर काही जिल्ह्यांना ऑरेंज (oranage) अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा गारपीट ? ;  या जिल्ह्यांना यलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट..
X

राज्यात (Maharashtra)गेल्या काही दिवसांपासून हवामानात ( Climate) मोठा बदल होत आहे. कधी तीव्र ऊन (sunlight) तर कधी अवकाळी पाऊस मध्येच गारांचा पाऊस (hailstrom) अशा विरोधी परिस्थितीचा सामना शेतकर्‍यांना (farmer) करावा लागत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा सामना करावा लागला आता पून्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (IMD)वर्तविण्यात आली असून काही जिल्ह्यांना येलो(yellow) तर काही जिल्ह्यांना ऑरेंज (oranage) अलर्ट देण्यात आला आहे.

जगाबरोबर भारतातील ऋतुचक्र विस्कळीत झालं आहे. मागील एक महिन्यापासून उन्हाळा असूनही शेतकर्‍यांना वादळ, अवकाळी पाऊस, गारपीटीचा सामना करावा लागत आहे. त्यातच हवामान विभागाकडून राज्यात दि.12 ते 16 एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे.आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट-

13 एप्रिल रोजी पालघर, ठाणे, रायगड, जळगाव, छ.संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, जालना, बीड, उस्मानाबाद, लातुर, सोलापूर, सांगली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, 14 एप्रिल रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातुर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, 15 एप्रिल रोजी अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातुर, नांदेड तर 16 एप्रिल रोजी अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातुर, नांदेड आदी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यात गारपीटीचा अंदाज -

हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 13 एप्रिल रोजी नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर तर 14 रोजी पुणे, अहमदनगर, सातारा, बीड, छ. संभाजीनगर आणि जालना आदी जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी आपला शेतातील मला सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच शेतातील कामे आटोपून घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

Updated : 13 April 2023 7:42 PM IST
Next Story
Share it
Top