शेतीच्या जोड धंद्यातून शेतकरी कमवत आहेत ४ लाखाचे उत्पन्न...
आजही अनेक शेतकरी आपल्या शेतात पारंपरिक पिके घेतात आणि अतिवृष्टी किंवा कोरड्या दुष्काळामुळे त्याचे नुकसान झाल्यास हताश होतात तर काही शेतकरी आत्महत्या सारखा मार्ग देखील स्वीकारतात, परंतु शेतीला जोडधंदा केल्यास शेतकरी आपली आर्थिक उन्नती साधू शकतात याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. खामगाव तालुक्यातील एक शेतकरी...वाचा त्याची यशोगाथा...
X
खामगाव तालुक्यातील रोहना येथील भागवत भारसाकडे हे आपल्या शेतातील ऊस आधी व्यापाराला विकायचे मात्र त्यामध्ये त्यांना फारसे उत्पन्न व्हायचे नाही, त्यामुळे त्यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी शेतीला जोड धंदा म्हणून आपल्याच शेतातील उसाच्या भरवशावर शेताजवळच रसवंती सुरू केली, ग्राहकांचाही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय, आणि आज रोजी आपल्या एक एकर शेतातील ऊस आणि रसवंतीच्या व्यवसायावर ते पाच महिन्यात चार ते साडेचार लाख रुपये उत्पन्न घेत आहेत.
रसवंती सुरू करण्यापूर्वी भागवत भारसाकडे यांना एक एकर ऊसामध्ये केवळ एक लाख रुपये उत्पन्न व्हायचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांबरोबर त्याला योग्य तो पूरक व्यवसाय सुरू करावा आणि त्यातून आपली उन्नती साधावी यामुळे निश्चितच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, असा विश्वासही यावेळी भागवत भारसाकडे हा शेतकरी बोलून दाखवतो.