Milk Adulteration दूध भेसळीचा पर्दाफाश करणारच: पदुम मंत्री विखे पाटील
दुध भेसळीचा पर्दाफाश करुन आरे डेअरीचे कर्मचारी अन्न औषध विभागाकडे वर्ग करणार- राधाकृष्ण विखे पाटील
X
राज्यातील अनेक जिल्ह्यात दूध भेसळीचा महापूर येत असल्याचे निदर्शनास आला आहे. यावर वेळीच आळा घातला नाही आणि पर्दाफाश केला नाही तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.. त्यामुळेच भले दुधाचा तुटवडा निर्माण होऊ द्या परंतु दूध भेसळीचा पर्दाफाश करणारच अशी घोषणा पदुम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे...
बंद पडलेल्या आरे डेअरीचे कर्मचारी अन्न आणि औषध प्रशासन विभागात समाविष्ट करण्याचा निर्णय दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे. राज्यामध्ये दूध भेसळीचे प्रकार वाढलेले असताना अन्न औषध प्रशासन विभागाकडे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दूध भेसळ थांबवण्यासाठी मर्यादा येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे असलेल्या आरे डेअरीचे कर्मचारी अन्न औषध विभागाकडे वर्ग करून कारवाई करणार असल्याचे विखे यांनी सांगितले आहे. मागील काही महिन्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात अन्न औषध प्रशासनाने धाडी टाकून भेसळयुक्त दुधाचा पर्दाफाश केला होता. राज्यात मोठ्या प्रमाणात दूध भेसळ होत आहे. मात्र या कारवाया कमी पडत आहेत या कारवाया वाढवण्यासाठी अन्न औषध प्रशासनाला कर्मचारी पुरवठा केला जाणार आहे. दूध भेसळीच्या कारवाया वाढल्या तर दूधाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो मात्र या कारवाया करणे आवश्यक असल्याचे देखील विखे यांनी म्हटले आहे.