Home > मॅक्स किसान > सोयाबीनचे भाव पडले, हमी भावाने सोयाबीन खरेदी मुदतही संपली: नाफेड ने मुदत वाढवावी

सोयाबीनचे भाव पडले, हमी भावाने सोयाबीन खरेदी मुदतही संपली: नाफेड ने मुदत वाढवावी

सोयाबीनचे भाव पडले, हमी भावाने सोयाबीन खरेदी मुदतही संपली: नाफेड ने मुदत वाढवावी
X

Soybean MSP सोयाबीन च्या हमी भावाने खरेदी करण्याची मुदत संपली आहे. सोयाबीन चे भाव हमीभावापेक्षा बरेच खाली गेल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सोयाबीन खरेदी करणारी शासकीय यंत्रने मार्फत नाफेडच्या खरेदीची मुदतही काल पासून संपल्याने शेतकऱ्यांसमोर आणखीनच अडचण निर्माण झाली आहे.

गेल्या महिन्यात सोयाबीन ला चांगला भाव मिळाला होता प्रति क्विंटल 6000 पर्यंत भाव शेतकऱ्यांना मिळाला, मात्र भाव अचानक खाली आल्याने शेतकऱ्यांना 4200 ते 4300 इतकाच भाव मिळत आहे म्हणजे 2000 रुपयांची भाव घसरले आहेत. वास्तविक सोयाबीन चा हमी भाव 4600 रुपये इतका आहे मात्र आता त्याखाली भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत.

नाफेड ने मार्च पर्यंत मुदत वाढवावी - रवींद्र भैय्या पाटील

नाफेड ने सोयाबीन हमी भावाने खरेदी साठी मुदत मार्च पर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी पणन महामंडळाचे चे माजी संचालक रवींद्र भैय्या पाटील यांनी मॅक्स किसान शी बोलतांना केली आहे शेतकऱ्यांना 4600 रुपये हमी भाव आहे आता हें भाव खाली गेले आहेत. हमी भाव खरेदी केंद्र बंद झाल्याने व्यापारी शेतकऱ्यांचा गैर फायदा घेतील. भाव वाढतील म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन साठऊन ठेवला आहे.शेतकऱ्यांच नुकसान होणार नाही यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Updated : 7 Feb 2024 1:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top