सोयाबीन आले कापणीला; पण शेतकऱ्यांना मजूर काही मिळेना
X
सोयाबीन कापणीला प्रारंभ झाला आहे. परंतु मजूर वर्गाची मनधरणी करुनही ते येत नाही आहेत. त्यामुळे कसे बसे 3200 ते 3500 रुपये एकर सोयाबीन कापायला मजुरांना द्यावी लागत आहे. यावर्षी जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाला. या पावसावरच शेतकऱ्यांनी नगदी पीक सोयाबीनचा पेरा घेतला. सर्व संकटांवर मात करत सद्यस्थितीत शेतकरी सोयाबीन कापणीची तयारी करीत आहे. परंतु मजूर मिळत नाही. त्यामुळे हे तिसरे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. सोयाबीनची पेरणी केली. तेव्हा काही दिवसानंतर पावसाची कमी जाणवत होती. त्यानंतर पाऊस पडला. परंतु यंदा दीड महिन्यांपासून येलो मोझॅक ने शेतकऱ्यांना त्रस्त करुन सोडले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाची फवारणी करुनही काही उपयोग होत नाही. तर केंद्र व राज्य सरकारने सोयाबीनला 6500 हजार रुपये हमी भाव द्यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.