Home > मॅक्स किसान > संभाजीनगर:राज्यातील शेतकरी अडकला अस्मानी आणि सुलतानी संकटात,शेतकरी राजा म्हणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांवर आणली अवकळा

संभाजीनगर:राज्यातील शेतकरी अडकला अस्मानी आणि सुलतानी संकटात,शेतकरी राजा म्हणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांवर आणली अवकळा

शेतकऱ्याचे सोयाबीन 4500 रूपये क्विंटल तर व्यापाऱ्याचे सीलबंद बॅगचे सोयाबीन 11000 रूपये क्विंटल,वाहरे सरकार! आणि त्यांचे शेतीधोरण.

राज्यातील शेतकरी सध्या फारमोठया अडचणीत सापडला आहे.ज्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, नापिकी आणि दुष्काळाचा तडाखा, तर दुसरीकडे वाढती महागाई, शेतमालाला नसलेला भाव, शेती अवजारे, बियाणे,खते, कृषी साहित्य यांच्या वाढत्या किमती त्यावरील GST आणि सरकारचे आडमुठे शेतकरी धोरण यामुळे शेतकरी मात्र पुरता हैराण झालाय.आणि या अस्मानी आणि सुलतानी संकटात, शेतकऱ्यांना शेतकरी राजा म्हणणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांवर मात्र अक्षरशः अवकळा आणली आहे.

सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती आणि सरकारचे शेतकऱ्यांचे शेती विषयक धोरण पाहून सुधीर फडकेंच्या गिताचे बोल आठवतात,

ज्यात "नरेंद्रा अजब तुझे सरकार","लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार"! म्हणण्याची वेळ आलीय.

कारण बाजारात शेतकऱ्याचे सोयाबीन 4500 रूपये प्रति क्विंटल तर त्याच बाजारातील व्यापाऱ्याच्या दुकानात सीलबंद बॅगचे सोयाबीन 11000 रूपये क्विंटल विकल्या जाात आहे.यावरून वाहरे सरकार! आणि त्यांचे शेतीधोरण असे म्हणण्याची वेळ आलीय.

आजच्या तारखेत सोयाबीनचा क्विंटलाचा दर 4500 रूपये तर लागवडी साठी पॅक बंद सोयाबीनच्या 30 किलोच्या बॅगचा दर 3200 रुपये येऊन ठेपलाय.त्यामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांनी,तुम्हीच सांगा,पेरावं काय अन् जगावं कसं असा प्रश्न सरकारला विचारलाय.

भाव वाढतील या आशेने आजही 30 टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच साठवून ठेवून आहे, पण भाव काही 4 हजार 500 रुपयांच्या पुढे सरकायला तयार नाही.अशातच आता खरीप हंगामाच्या लागवडीची लगबग सुरु झालीय.पण बाजारात मात्र सोयाबीनच्या दरा संदर्भात वेगळीच स्थिती आहे.ज्यात शेतकऱ्यांचे सोयाबीन 4500रुपये प्रती क्विंटल तर पेरणीसाठी 30 किलो सोयाबीन बियाणाला 3200 ते 3500 रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती पाहून तुम्हीच सांगा,काय शेतकरी वरी येईल का?असा सूर आपसूकच शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.

एकरी सोयाबीन लागवडी पोटी येणारा खर्च या प्रमाणे





नांगरणी-800रुपये

रोटावेटर-800 रुपये

पेरणी-800 रुपये

सोयाबीन बियाणे बॅग 30किलो -3200 रूपये

रासायनिक खत-2500 रुपये

सोयाबिन फवारणी-2500 रुपये

सोयाबीन कापणी-3000 रूपये प्रति बॅग

मळणी यंत्रात काढणी-2000 रुपये

असा एकूण जवळपास एका सोयाबीनच्या बॅगला 16000 रुपये खर्च येतो. ज्यातून अवकाळी,अतिवृष्टी,दुष्काळ यातून वाचून एका सोयाबिन बॅगला तीन क्विंटल सोयाबिन होते. ज्याची आजच्या बाजार पेठे नुसार किंमत 13500 रुपये एवढी होते,ज्यात त्याची,त्याच्या कुटुंबाची मेहनत तर मिळतच नाही.पण यातून लागवडीचा खर्च16000 रुपये वजा केला तर शेतकऱ्याला एवढे करूनही 2500 रुपये स्वतः च्या खिशातून भरण्याची वेळ येते.

सोयाबीन पिकाचा उतारा एका बॅगला एकरी पाच ते सहा क्विंटल येतो. पण अतिवृष्टी आणि अवकाळीच्या तडाख्यात सोयाबीनचा हा उतारा आता दोन ते तीन क्विंटलवर आलाय. पण लागवड व इतर पूर्ण खर्च लावला तर शेतकऱ्याच्या हाती मात्र काहीच लागत नाही. त्यामुळे एक तर पिकाचा उतारा कमी आणि उत्पादित मालाला भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. म्हणून शेतमालाला भाव मिळाला तरच देशाची आणि शेतीची प्रगती होईल.सोयाबीन पीक हे पावसाळ्यात येते ज्यात अतिप्रमाणात पाऊस झाला तर शेतकऱ्यांच्या हाती काही लागत नाही.अशा पेचप्रसंगात दुष्काळाचे गडद सावट शेतकऱ्यांवर उभे राहते.





दरम्यान शेतकरी शेतीतील खुरपणी, निंदणे, कोळपणी अशी कामे शेतमजूरांकडून करून घेतात.पण त्यांच्याकडूनही आता महागाईमुळे वाढीव रोजंदारी वरून अडवणूक होत आहे.

ज्यात शेतमजुरीचे दरदेखील मनमानीपणे वाढले आहेत. तर शेतकरी पेरणी,आंतरमशागत यासाठी लहान ट्रॅक्टरचा वापर करतात. मात्र, पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे शेती करणे अवघड झालेय.

मग अशी परिस्थिती निर्माण होते की, 'पिकली तर शेती नाही तर जिवाची माती" अशावेळी शासनाकडून कोणतीही भरीव मदत मिळत नाही. सरकारकडून शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेती करणे अवघड झाले असुन अनेकांनी शेती करणे सोडून दिले आहे.



Updated : 23 May 2024 1:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top