शरद पवार बारामतीच्या मैदानात; मतदारसंघात नव्या रणनितीची आखणी
X
पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांच्या प्रतिष्ठेचा बनला असून,पवार विरुद्ध पवार असा सामना पहायला मिळणार अशी चर्चा आहे. बारामती लोकसभेच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षबांधणी आणि प्रचाराची सुरुवात अजित पवार आणि गटाकडून करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार यांनी स्वतः कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी पक्ष बांधनी, आणि बैठका सुरू केल्या आहेत. लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पवारांनी प्रतिष्ठित केली असून पवार विरुद्ध पवार असा सामना महाराष्ट्र सह देशाला पाहायला मिळणार आहे. प्रतिष्ठेच्या ह्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी स्वतः शरद पवार आणि अजित पवार दोघेही राजकीय आखाड्यात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची विधानसभा मतदार संघानुसार बैठका घेण्यास सुरुवात केली असून. कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांशी चर्चा करत बारामती लोकसभा मतदारसंघासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसद रत्न पुरस्कार प्राप्त असून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे गेले अनेक वर्ष खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. गेल्या निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांची मोठी साथ होती. अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. अजित पवार त्यांनी शरद पवारांची साथ सोडत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महायुतीत प्रवेश केल्यानंतर लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उभ करत असल्याची चर्चा असल्याने. व त्या पद्धतीने मतदार संघाची बांधणी अजित पवार यांच्याकडून होत असल्याने. शरद पवार देखील कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी पक्ष बांधणी करत बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी स्वतः मैदानात उतरल्याचे चित्र समोर आले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये खडकवासला, दौंड, इंदापूर, पुरंदर,भोर यांसह बारामती विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकण्यासाठी शरद पवार यांनी संबंधित विधानसभा मतदारसंघानुसार बैठका घेण्यास सुरुवात केली असून कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी स्वतः शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात उतरल्याचे चित्र समोर आले आहे.