कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांना न्याय दिल्यास काय बिघडेल ? : छगन भुजबळ
शेतकरी महिनोंमहिने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत बसले आहेत. लोक मरत आहेत, परंतु पंतप्रधान ठोस निर्णय घेत नाहीयत. काय बिघडणार आहे शेतकऱ्यांना न्याय दिला तर कृषी कायदे रद्द केले तर असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 2 Feb 2021 3:45 PM IST
X
X
बायका-पोरं घेऊन थंडी वार्यात कोरोना असताना शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. त्यांना कोण म्हणतंय खलिस्तानी तर कोण बोलतंय पाकिस्तानी अरे काय चाललंय हे ? असा संतप्त सवालही छगन भुजबळ यांनी केला आहे. जे तुमच्या आमच्यासाठी हा देश अन्नधान्याने दुष्काळी होता त्यावेळी या शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवलं आणि परदेशातही एक्स्पोर्ट केलं
त्या शेतकऱ्यांना दोन - चार दिवस ठिक आहे. महिनोंमहिने आंदोलन करावे लागते आहे. पंतप्रधान मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. कृषी कायदे रद्द करा मागे घ्या तो रिफिल करा. नवीन कायदा बनवायचा असेल तर नवीन बनवा आणि शेतकर्यांबरोबर चर्चा करा असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिला आहे.
Updated : 2 Feb 2021 3:45 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire