Home > मॅक्स किसान > आज दिल्लीत संयुक्त किसान मोर्चातील शेतकऱ्यांची महापंचायत, काय आहेत मागण्या?

आज दिल्लीत संयुक्त किसान मोर्चातील शेतकऱ्यांची महापंचायत, काय आहेत मागण्या?

Sanyukt Kisan Morcha on Kisan Mahapanchayat At Jantar Mantar Delhi

आज दिल्लीत संयुक्त किसान मोर्चातील शेतकऱ्यांची महापंचायत, काय आहेत मागण्या?
X

हमीभावाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आज संयुक्त किसान मोर्चा दिल्लीच्या जंतरमंतरवर किसान महापंचायत घेत आहे. या महापंचायतला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जंतर मंतरवर निदर्शनं केल्यानंतर शेतकरी नेते राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे.

या शेतकरी आंदोलनात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशमधील शेतकरी या महापंचायतीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आले आहेत.


काय आहेत शेतकऱ्यांचा मागण्या...

देशातील सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जावं

शेतकरी आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.

वीज विधेयक रद्द करावं.

केंद्र सरकारने आणलेली नवीन अग्नीपथ योजना मागे घ्यावी.

लखीमपूर खेरी हत्याकांडातील शेतकरी कुटुंबीयांना न्याय, तुरुंगात असलेल्या शेतकऱ्यांची सुटका आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांना अटक

स्वामीनाथन आयोगाच्या C2+50 टक्के सूत्रानुसार एमएसपीची हमी देणारा कायदा

ऊसाच्या आधारभूत किंमतीत वाढ करून थकबाकी तातडीने द्यावी

जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडावे आणि सर्व मुक्त व्यापार करार रद्द करावेत

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत असलेली शेतकऱ्यांची थकबाकी तात्काळ द्यावी


राकेश टिकैत यांना ताब्यात घेतलं…

दिल्लीत महापंचायत आंदोलनात येत असलेल्या शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात…

काल टिकैत शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत असताना त्यांना दिल्लीच्या बॉर्डरवर ताब्यात घेऊन परत पाठवण्यात आलं आहे.

दिल्लीतील सिंघु, टीकरी आणि गाजीपुर बॉर्डर सहित जंतर मंतर च्या भागातील सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विविध ट्रेनमधून दिल्लीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांना अडवलं जात आहे. दिल्लीच्या बॉर्डरवर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

काय आहे संयुक्त किसान मोर्चा

संयुक्त किसान मोर्चा (गैरराजनैतिक संघटन) 65 शेतकरी संघटनेची एक मोठी संघटना आहे. गेल्या वर्षी याच संयुक्त किसान मोर्चाने दिल्लीतील विविध सीमांवर केलेल्या आंदोलन केल्यानंतर केंद्र सरकारला तीन कृषी कायदे परत घ्यावे लागले होते.

Sanyukt Kisan Morcha on Kisan Mahapanchayat At Jantar Mantar Delhi

Updated : 22 Aug 2022 10:03 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top