Home > मॅक्स किसान > तुम्ही कैरीचा बाजार पाहिलायं का?

तुम्ही कैरीचा बाजार पाहिलायं का?

चोपड्यात कैरी बाजारात मंदीचे सावट; पाऊस लांबल्याने बाजारात ग्राहकांची कमी

तुम्ही कैरीचा बाजार पाहिलायं का?
X

चोपड्यात कैरी बाजार भरला आहे. बाजारात कैरीची आवक मोठ्या प्रमाणावर असली तरी पाऊस नसल्याने ग्राहक नसल्याने बाजारात मंदीचे सावट दिसत आहे. लोणच टाकण्यासाठी बाजाराच्या दिवशी चोपडा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर लोणचच्या बाजार करण्यासाठी येत असतात. परंतु पाऊस लांबल्याने बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहक नाही..आणलेल्या भावात व्यापाऱ्यांना कैरी विकावी लागत आहे. लोणच्यासाठी लागणारा मसाला विक्रेते ग्राहकाची वाट पाहत आहेत. कैरी विक्रेते कैऱ्या हातात घेऊन आरोळ्या मारताना दिसत आहेत. पाऊस जर पडला तर पुढे येणाऱ्या बाजारात ग्राहकांची गर्दी होईल आणि व्यापारांचा व्यवसाय देखील होईल अशी अपेक्षा बाजारातील व्यावसायिक करीत आहेत. चोपड्याच्या कैरी बाजारात ग्राहकांना पाय ठेवण्यासाठी जागा नसते तर वाहन लावण्यासाठी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पोलीस बंदोबस्त लावावा लागतो. परंतु पाऊस नसल्याने मार्केटमध्ये ग्राहकांचे गर्दी दिसत नाही

Updated : 19 Jun 2023 7:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top