Home > मॅक्स किसान > कोकणासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची धामधुम..

कोकणासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची धामधुम..

राज्यात एका बाजूला गणेश उत्सवाची धामधूम सुरू झाली असतानाकोकणात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकणासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची धामधुम..
X

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सरकला असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून, उदयपूर, मध्य प्रदेशातील कमी दाब क्षेत्रातून गोंदिया, भुवनेश्‍वर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती (शेअर झोन) कायम आहे.

पुन्हा कमी दाब क्षेत्राचे संकेत

बंगालच्या उपसागरात तयार झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेश परिसरावर असून, त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. उपसागरात शनिवारपर्यंत (ता.११) नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे रविवारपासून (ता.१२) पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

कोकण, उत्तर महाराष्ट्रात आज (ता. ९) तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, नाशिक

कोकण : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी.

Updated : 10 Sept 2021 9:26 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top