Home > मॅक्स किसान > अन्नदात्यांनो हे पत्र वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

अन्नदात्यांनो हे पत्र वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

सलग तेविसाव्या दिवशी कडाक्याच्या थंडीत राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या बैठका निष्फळ ठरल्यानंतर आता सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्विटरवरुन साद घालत कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी लिहलेले पत्र अन्नदात्यांनी वाचावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अन्नदात्यांनो हे पत्र वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
X

नव्य़ा कृषी कायद्याविरोधात पेटलेले शेतकरी आंदोलन आता सुप्रिम कोर्टात पोचले आहे. शेतकऱ्यांना अहिंसक आंदोलनाचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याचा सल्ला केंद्राला दिला. मात्र, तसं केल्यास शेतकरी चर्चेस तयार होणार नाही असं सांगत केंद्र सरकारने हा सल्ला अमान्य केला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लिहिलेलं पत्र ट्विट केलं असून शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.

सुरवातील बदनामी करुन आंदोलन फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर नव्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी पत्र लिहिलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, पियूष गोयल, निर्मला सीतारमन तसंच भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नरेंद्र तोमर यांच्याकडून हे पत्र प्रसिध्द करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र तोमर यांचं हे पत्र ट्विट केलं असून शेतकऱ्यांना ते वाचण्याचं आवाहन केलं आहे.

विशेष म्हणजे आज मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून संवाद साधणार आहेत. यावेळी ते शेतकरी आंदोलनाबाबत काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 18 Dec 2020 9:36 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top