सातपुड्याचा रानमेवा बाजारात दाखल
सातपुड्याचा रानमावा बाजारपेठेत दाखल,सातपुड्यातील गावरान सीताफळाना मोठ्या प्रमाणात मागणी
X
सातपुड्याच्या रानमेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे असल्याने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारपेठांमध्ये सीताफळाचा आगमन होते. सातपुड्यातील सिताफळ शेतातील सीता फळांपेक्षा चविष्ट असल्याने त्यांना बाजारपेठेत मोठी मागणी असते, सातपुड्यात सुद्धा फळ खरेदी करण्यासाठी राज्यभरातील व्यापाऱ्यांची लगबग वाढली आहे त्यासोबत स्थानिक बाजारपेठांमध्ये ही सातपुड्याच्या सिताफळ दाखल झाल्याने ते खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे .सातपुड्यात सीताफळाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात येत असल्याने तेथील आदिवासींना तात्पुरता स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होत असतो हे सिताफळ पूर्णतः सेंद्रिय पद्धतीचे असल्याने सरकारने या भागात सिताफळ प्रक्रिया उद्योग उभारावेत तसेच बाहेरच्या बाजारपेठेत सीताफळांची मार्केटिंग करावे मोठ्या शहरांमध्ये सीताफळ महोत्सव भरून सातपुड्याच्या आदिवासींना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
: