Home > मॅक्स किसान > कोकण, विदर्भात 'ऑरेंज अलर्ट'

कोकण, विदर्भात 'ऑरेंज अलर्ट'

कोकण, विदर्भात ऑरेंज अलर्ट
X

Rain Alert: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचे संकेत मिळत असल्याचा भारतीय हवामान IMD विभागाने अंदाज व्यक्त केला आहे आजपासून आगस्ट च्या पहिल्याच दिवशी कोकण, घाटमाथा सातारा आणि कोल्हापूर तील काही भाग तसंच पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भ आणि कोकणातील रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरीत जोरदार पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात ढगाळ आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रात सौराष्ट्र लगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. मॉन्सूनचा चा असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगर, हिस्सार, दिल्ली, हरदोई, देहरी, पुरूलिया, सागर बेट ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे.

दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या विरोधी वाऱ्यांचे क्षेत्र तयार झाले आहे यामुळे कोकण, घाटमाथ्यासह राज्यात असलेला पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे.

Updated : 1 Aug 2024 2:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top