कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा ;कवडीमोल दराने विक्री
X
संगमनेर तालुक्याच्या पठार भागात या वर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली होती.तर कांद्याची काढणी ही आता पुर्ण होत आलेली आहे. परंतु बाजारभाव कोलमडल्याने शेतकऱ्यांवर नैराश्याची वेळ आलेली असल्याने कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.पठार भागातील हजारो एकरवरील डाळींब तेल्या आणि मुळकुज रोगामुळे काढुन टाकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली .तर त्या सर्वच क्षेत्रांवर शेतकर्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती. दोन वर्षांत कोरोनामुळे शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्न घटले होते त्यामुळे या वर्षी कांद्याचा चांगला मोबदला भेटेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु खते, औषधे,मशागत,मजूरी या सर्वांचेच भाव मोठ्या प्रमाणात वाढले परंतू कांद्याला आजही पाच ते दहा रूपयांच्या दरम्यान बाजार भाव मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.