Home > मॅक्स किसान > सिंघू बॉर्डरवरील हत्येप्रकरणी दुसरा आरोपी पोलिसांना शरण

सिंघू बॉर्डरवरील हत्येप्रकरणी दुसरा आरोपी पोलिसांना शरण

सिंघू बॉर्डरवरील हत्येप्रकरणी दुसरा आरोपी पोलिसांना शरण
X

सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आता दुसऱ्या आरोपीलाही अटक केली आहे. शरण आलेला दुसरा आरोपी देखील निहंग शीख आहे. नरेन सिंग असे त्याचे नाव असून हा आरोपी अमृतसरमध्ये शरण आला आहे. सिंघू बॉर्डरवर शेतकऱी आंदोलनाच्या ठिकाणी एका ३५ वर्षीय व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करुन टांगून देण्यात आले होते. याप्रकरणी सरवजीत सिंग या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर आता दुसऱ्या आरोपीलाही अटक झाली आहे. प्राथमिक चौकशीनंतर पंजाबमधील तरनतारनमधील चीमा कलन या गावातील लखबीर सिंग या दलित तरुणाची निहंग शीखांनी हत्या केली होती, अशी माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. गुरूद्वारामधील पवित्र ग्रंथाची विटंबना केली म्हणून त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या सामूहिक हत्या प्रकरणात नरेन सिंग हा देखील एक आरोपी आहे. नरेन सिंग याने दिलेल्या निवेदनात आपण गेले १० महिने शेतकरी आंदोलनाचा हिस्सा होता पण कधीही प्रसिद्धीच्या मागे धावलो नाही. पण संयुक्त किसान मोर्चाचे याआधीच निहंग शीखांचा शेतकरी आंदोलनाशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान शुक्रवारी अटक कऱण्यात आलेल्या सरवजीत सिंगला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आता या प्रकरणातील इतर आरोपी आणि वापरण्यात आलेली शस्त्र याबाबतची माहिती त्याच्या चौकशीतून समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Updated : 16 Oct 2021 8:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top