Home > मॅक्स किसान > युवा शेतकऱ्याने कोरडवाहूत फुलवल ड्रॅगन फ्रुट

युवा शेतकऱ्याने कोरडवाहूत फुलवल ड्रॅगन फ्रुट

युवा शेतकऱ्याने कोरडवाहूत फुलवल ड्रॅगन फ्रुट
X

सातपुड्यात कोरडवाहू आणि खडकाळ जमीन, यासोबतच पाण्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न होत नाही, इथल्या आदिवासीना दुसऱ्याकडे मजुरीला जावं लागत.

केवळ पारंपरिक शेतीवरच अवलंबून न राहता नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात वसलेल्या डाब-वालंबा येथील 12 वी पास दिलीप पाडवी या युवा आदिवासी शेतकऱ्यान कोरडवाहू क्षेत्रावर घेतल्या जा‌णाऱ्या विदेशी ड्रॅगन फ्रूट यशस्वी प्रयोग केला.

दिलीप पाडवी ला कृषी विभागान मदत केलीय.

60 रुपये दराने ड्रॅगन फ्रुट चे रोप उपलब्ध करून देण्यात आलीय आपल्या शेतात 500 रोपांची लागवड केलीय. मागच्या जून महिन्यात त्यांनी ही रोप लावले असून आता वर्षभरानंतर त्या झाडांना ड्रगन फ्रुट येतंय. ठिंबक सिंचन चा वापर करत आणि कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत आणि कीटकनाशक न वापरता त्यांनीही ड्रॅगन फ्रुट ची यशस्वी शेती केली


Updated : 11 July 2024 6:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top