Home > मॅक्स किसान > Monsoon2023 मान्सून घाटमाथ्यावर अडकला

Monsoon2023 मान्सून घाटमाथ्यावर अडकला

मान्सूनचे (Monsoon) आगमन उशिरा झाले असले तरी अलनिनोच्या (El Nino) प्रभावामुळे सर्व गोष्टी अति-अनुकूल असूनही पाऊस घाट माथ्यापर्यन्तच अडकला आहे अजुन आठवडाभर चित्र विशेष आशादायी नाही, त्यामुळे ओल असेल तरच पेरणी करावी अन्यथा शेतकऱ्यांनी रिस्क घेऊ नये असं हवामान तज्ञांनी म्हटलं आहे.

Monsoon2023 मान्सून घाटमाथ्यावर अडकला
X

मान्सूनचे आगमन उशिरा झाले असेल तरी अलनिनोच्या प्रभावामुळे सर्व गोष्टी अति-अनुकूल असूनही पाऊस घाट माथ्यापर्यन्तच अडकला आहे अजुन आठवडाभर चित्र विशेष आशादायी नाही, त्यामुळे ओल असेल तरच पेरणी करावी अन्यथा शेतकऱ्यांनी रिस्क घेऊ नये असं हवामान तज्ञांनी म्हटलं आहे.

या सर्व मान्सून काळातील ह्या सर्व वातावरणीय पाच मुख्य प्रणाल्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्यासाठी अति-अनुकूल असुनही अपेक्षित पाऊस हा फक्त कोकण व सह्याद्रीच्या घाटमाथ्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात अगदीच तुरळक ठिकाणीच किरकोळ पाऊस पडत आहे. परंतु जो पडतो आहे तो मान्सूनी पावसाला साजेसा असा अधिक क्षेत्र व्यापकतेचा, दिर्घ कालावधीचा व एका संथ लयीतल्या पडणाऱ्या गुणधर्म जाणवत नाही.




भारतीय हवामान विभाग (IMD) चार आठवड्याच्या पूर्वानुमानानुसार सात ते 13 जुलै 14 जुलै ते 20 जुलै २१ जुलै ते 27 जुलै या काळात कोकणामध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे सात जुलै ते 13 जुलै या आठवड्यात मध्य महाराष्ट्र मध्ये तसेच विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडेल मला परंतु 14 ते 20 जुलै या कालावधीत महाराष्ट्रात पाऊस नसेल. 21 ते 27 जुलै दरम्यान पाऊस पुन्हा पडतील त्यानंतर 28 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान पुन्हा पावसाचे प्रमाण खालवण्याची शक्यता आहे..



पुढील ६ दिवस म्हणजे बुधवार दि.१२ जुलै पर्यन्त, कोकण व पूर्व विदर्भातील ३ जिल्हे वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील १८ जिल्यात पावसाची तीव्रता अजुन कमी होवुन केवळ मध्यमच पावसाची शक्यता आहे.पाऊस फक्त घाट माथ्यापर्यंतच मर्यादित आहे.

२० जुलै पर्यन्त अशी अवस्था राहिली तरी आश्चर्य वाटायला नको. २१ जुलै नंतरच्या आठवड्यात मान्सून पुन्हा उर्जीतावस्थेत येऊ शकतो, असे वाटते. तो पर्यन्त ' वाट बघा, लक्ष ठेवा ' ह्या फेज मधून जावे लागेल.

अर्थात वर अ.क्रं.१ अंतर्गत वातावरणीय प्रणाली (iv) देशाच्या वायव्यकडे जर सरकून उत्तर विदर्भ व पूर्व मध्य प्रदेश दरम्यान एक- दोन दिवस स्थिरावली तर त्यातून महाराष्ट्राच्या टंचाईग्रस्त मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा असल्याचं हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रासाठी जुलै महिन्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज असुनही जर अर्धा महिना (१५ जुलै पर्यन्त)अशीच अवस्था असणार असेल आणि उरलेला अर्ध्या महिन्याची सरासरी जर कोकण व पूर्व विदर्भातील ३ जिल्ह्यातील जोरदार पावसाने भरून निघणार असेल तर पाऊस वितरणाची ही असमान विसंगती खरीपातील शेतपीक नियोजनास धोकादायक ठरु शकते. २१ ते २७ जुलै च्या आठवड्यातील पावसावरच ह्या सरासरीची भिस्त अवलंबून असेल.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पश्चिम विदर्भातील (१०+८+८)२६ जिल्यात चांगल्या ओलीवरच्या पेरणीसाठी व पेर झालेल्या नाजूक रोपट्यांसाठी पावसाची अजुनही प्रतिक्षा आहे.शेतकरी चातकासारखी पावसाची वाट बघत आहे. अजुन ह्या क्षेत्रात बऱ्याच पेरण्या बाकी आहेत. ज्या संयमी जाणकार शेतकऱ्यांनी राज्य कृषी खाते व केंद्रीय हवामान खात्याच्या सूचनाकडे लक्ष दिले असेच शेतकरी दुबार-पेरणी व वायफळ गुंतूवणूकीपासून सुरक्षित आहेत. अर्थात महाराष्ट्रातील तुरळक काही ठिकाणी बियाणे उतरून पडेल इतपत पेर-योग्य पाऊस ६ व ७ जुलैपर्यन्त झाला आहे. अश्या सर्व ठिकाणी पेर करण्यास हरकत नसावी असे असे माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे. एकदम बाखर ओलीवर मात्र पेरणी मुळीच करू नये असेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

संपूर्ण देशात सध्या ह्या आठवड्यात सगळीकडे जोरदार पाऊस होत आहे. मात्र फक्त कोकण व काहीसा विदर्भ (१० जिल्हे) वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २६ व सीमांध्रतील रायलसीमा भागातील ८ जिल्ह्यासहित संपूर्ण तामिळनाडू व तेलंगणा राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यातही मान्सून ट्रफ सरासरी जागेपेक्षा उत्तरेकडे सरकणे, तसेच मॅडन जूलीयन ऑसीलेशनही पुढील २ आठवडे पावसासाठी पूरक जाणवत नाही.

पावसापासून मनुष्य आणि वित्त हानी होऊ नये आणि प्रशासनाला कृती-कार्यवाही करता यावी म्हणून ह. खात्याकडून लाल ते पिवळ्या रंगापर्यंत पावसाच्या तीव्रतेनुसार लघु कालावधीचे (५ दिवसाचे) धोक्याचे इशारे (अलर्ट्स) दिले जातात.

परंतु प्रत्यक्ष तो दिवस उजाडेपर्यंत जर वातावरणात काही बदल झाल्यास हवानान खात्याकडून एका पायरीने चढ किंवा उतार करून सुधारणा केली जाते, व तसे सूचित केले जाते. अंदाजाच्या अचूकतेकडे जाण्याचा हा प्रयत्न असतो. ' नोआ ' म्हणते ८ जून लाच ' एल- निनो ' विकसित झाला तर ' आयएमडी ' च्या अहवालनुसार सध्या 'एन्सो ' न्यूट्रल अवस्थेत म्हणजे ना 'एल -निनो' ना ' ला-निना स्थिती आहे. येणाऱ्या पावसाळ्यात ' एल- निनो ' विकसित होईल. म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यात पावसात घट ही होवु शकते. शिवाय ' आय.ओ.डी. ही ना ' धन ' ना ' ऋण ' अवस्थेत आहे. म्हणजे मान्सूनच्या पावसाठी घातक नसली तरी पूरक ही नाही. ही देशात वातावरणाची सध्य:स्थिती आहे. एकंदरीत कितीही विधायक आणि सकारात्मक शक्यता मान्सूनच्या पावसाच्या बाबतीत मांडल्या तरी ' स्मरण असावे एल-निनोचे ' असेच सध्या म्हणावे लागेल.

सध्याच्या वातावरणातील ही जटीलता एटमोस्फेरिक फिजिक्स मधील 'गतिक हवामानशास्र ' (डायनॅमिक मिटीओरोलॉजी)उपविषयातील हवामान घटकांची सूक्ष्म पातळीवरील गतिशीलते वर आधारित आहे.सध्याचा वातावरणीय गुंता-गुंतीचा खेळ हा त्याचाच परिणाम समजावा. खरे तर वैज्ञानिकांना हे एक आव्हानच वाटू लागले आहे. आणि ह्याच ठिकाणी वैज्ञानिक हे आव्हान तर स्वीकारतीलच. पण पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करणेही कसा गुंता-गुंतीचा खेळ असतो, ह्याचीही नोंद ह्या निमित्ताने जन-सामान्यांनी लक्षात घ्यावे असे खुळे यांनी शेवटी म्हटले आहे.

राज्यात 30 टक्के पावसाची तूट

राज्यात सरासरी सध्या तीस टक्के पावसाचे तूट असून जुलै च्या पहिल्या आठवड्यात पालघर मध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबई उपनगर रायगड ठाणे, नाशिक नंदुरबार लातूर भंडारा गोंदिया हा पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे.राज्यामध्ये जुलै च्या पहिल्या आठवड्या पर्यंत सांगली हिंगोली जालना अकोला येथे पावसाची तीव्रत तूट असून कोकणामध्ये सातत्यपूर्ण पाऊस असल्याने कोकणातील पावसाची तूट भरून यायला मदत होत आहे. सिंधुदुर्ग मधील पावसाचे तुट भरून निघाली आहे.

एकंदरीतच उशिराच्या पावसाने शेतीची अवस्था बिकट झाली आहे." दरवर्षी जुलैत या काळात राज्यात 100 टक्के पेरणी पूर्ण झालेली असते. यंदा फक्त 14 टक्के पेरणी झालेली आहे. कृषी विभागाचा अधिकृत अहवाल हे सांगतोय, म्हणजे प्रत्यक्ष 8-10% असेल. कागदावरचा पीक पेरा सोडून देऊ. भात 5%, ज्वारी 2%, बाजरी 1% फक्त लागवड झालीय. उद्या खायचे काय. कडधान्य अवघा 7% पेरा आहे. आता त्याच्या लागवडीची वेळ निघून गेली आहे. उडीद-मूग-तूर दिसणार सुध्दा नाही आपल्याला, खायला मिळणे तर दूरच. वरण-भात स्वप्नातच! मका 8% आहे फक्त, तेलबिया फक्त 11% ... उद्या घरात फोडणी कशी देणार? आपण बसलोय सर्व राजकीय खिचडी पकवत!! आज शेतकरी जात्यात आहे, उद्या आपण नक्कीच असू. अन्नाला मोताद होऊ, असं ज्येष्ठ पत्रकार विक्रांत पाटील यांनी म्हटले आहे.

पाऊस पडण्यास अनुकूल घटक कोणते?

गेल्या ४ दिवसा(४जुलै)पासून

(i)मान्सून-ट्रफ आणि

(ii)ऑफ-शोर-ट्रफ -गुजरात ते केरळ अरबी समुद्र संपूर्ण पश्चिम किनारपट्टी

(iii)१९ डिग्री उत्तर अक्षवृत्त दरम्यानचा ४ ते ६ किमी उंचीवरील २ किमी हवा जाडीत पूर्व-पश्चिम असा एकमेका विरोधी वाहणारा वारा-दिशा बदल

(iv)अरबी समुद्रातील महाराष्ट्रात-गुजरात किवारपट्टी सीमाक्षेत्र बेचक्यात २ ते ६ किमी.उंचीवरील ४ किमी. हवा जाडीत गोलाकार चक्रीय वारा स्थिती असून

(v)झारखंड राज्य भू-भागावर खालच्या पातळीतील उंचीवरील गोलाकार चक्रीय वारा स्थिती आहे.

1."महाराष्ट्रातील तुरळक काही ठिकाणी बियाणे उतरून पडेल इतपत पेर-योग्य पाऊस ६ व ७ जुलैपर्यन्त झाला आहे. अश्या सर्व ठिकाणी पेर करण्यास हरकत नाही."





2."संयमी जाणकार शेतकऱ्यांनी राज्य कृषी खाते व केंद्रीय हवामान खात्याच्या सूचनाकडे लक्ष दिले असेच शेतकरी दुबार-पेरणी व वायफळ गुंतूवणूकीपासून सुरक्षित आहेत".




3."मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पश्चिम विदर्भातील (१०+८+८)२६ जिल्यात चांगल्या ओलीवरच्या पेरणीसाठी आणि पेर झालेल्या नाजूक रोपट्यांसाठी पावसाची अजुनही प्रतिक्षा आहे.शेतकरी चातकासारखी पावसाची वाट बघत आहे".


4."संपूर्ण देशात जोरदार पाऊस होताना फक्त कोकण व काहीसा विदर्भ (१० जिल्हे) वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २६ व सीमांध्रतील रायलसीमा भागातील ८ जिल्ह्यासहित संपूर्ण तामिळनाडू व तेलंगणा राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे"




5.वातावरणीय प्रणाली देशाच्या वायव्यकडे जर सरकून उत्तर विदर्भ व पूर्व मध्य प्रदेश दरम्यान एक- दोन दिवस स्थिरावली तर त्यातून महाराष्ट्राच्या टंचाईग्रस्त मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.




6."पुढील ६ दिवस म्हणजे बुधवार दि.१२ जुलै पर्यन्त, कोकण व पूर्व विदर्भातील ३ जिल्हे वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील १८ जिल्यात पावसाची तीव्रता अजुन कमी होवुन केवळ मध्यमच पावसाची शक्यता आहे."





वाट बघा, लक्ष ठेवा

7."पाऊस फक्त घाट माथ्यापर्यंतच मर्यादित आहे.२० जुलै पर्यन्त अशी अवस्था राहिली तरी आश्चर्य वाटायला नको. २१ जुलै नंतरच्या आठवड्यात मान्सून पुन्हा उर्जीतावस्थेत येऊ शकतो."





8."वातावरणीय पाच मुख्य प्रणाल्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्यासाठी अति-अनुकूल असुनही अपेक्षित पाऊस हा फक्त कोकण व सह्याद्रीच्या घाटमाथ्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात अगदीच तुरळक ठिकाणीच किरकोळ पाऊस पडत आहे."

माणिकराव खुळे

Meteorologist (Retd.)

IMD Pune.

भारतीय हवामान खाते, पुणे

Updated : 8 July 2023 9:18 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top