Monsoon2023 मान्सून पुन्हा सक्रिय
मागील आठवड्यापासून स्थिर झालेला माणसाने आता पुन्हा एकदा तीव्रता धारण केली आहे.पुढील ५ दिवसांत बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळेल असा, अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईसह तब्बल १७ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
X
मागील आठवड्यापासून स्थिर झालेला माणसाने आता पुन्हा एकदा तीव्रता धारण केली आहे.पुढील ५ दिवसांत बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळेल असा, अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईसह तब्बल १७ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
17/07: पाऊस खूप पाऊस ...राज्यात https://t.co/j0Wcnl5hHD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 17, 2023
यंदा तब्बल महिनाभर उशिरा मान्सून राज्यात दाखल झाला होता. पण आठवडाभरापासून काही भागात पावसाने उसंत घेतली होती. पण आता राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील ४ ते ५ दिवस मान्सून सक्रिय (Monsoon 2023) राहणार आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
याशिवाय कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट व जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातही ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुण्यात मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरात बुधवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते.
It's raining Maharashtra(even Marathwada).Rain in past 12hrs(cm):Colaba-5,Santacruz-4,Matheran-6, Mahabaleshwar-6,Thane-3, Chinchwad -1.Rain very likely to increase in 48hrs. Orange/red alerts are issued for areas of Konkan& ghats of Madhya Maharashtra. So, follow our Advisories pic.twitter.com/oTtTqPMeGH
— Anupam Kashyapi Never B Upset (@anupamkashyapi) July 17, 2023
साताऱ्यात घाट परिसरात बुधवार ते शुक्रवार ऑरेंज अॅलर्ट आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rain Alert) होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईत सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर आणखीच वाढणार, असंही हवामान खात्याने सांगितलं.
कोकणपट्टीत काल दिवसभरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कुलाबा येथे सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर माथेरान येथे ६४ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. महाबळेश्वर येथेही दिवसभरात पावसाची दमदार उपस्थिती होती. महाबळेश्वर येथे ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये शुक्रवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून, रायगडमध्ये बुधवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता आहे.
मुंबईसाठी बुधवारी ऑरेंज अॅलर्ट, तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवशी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतरही कोकण विभागात पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यता आहे.
मराठवाड्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा
सध्या दक्षिण झारखंड आणि शेजारील परिसरामध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून ट्रफही सध्या सक्रिय आहे, तसेच बंगालच्या उपसागरांत येत्या ४८ तासांमध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मान्सूनला चालना मिळाली आहे. विदर्भामध्ये पुढील पाच दिवसांत सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी ऑरेंज अॅलर्टही देण्यात आला आहे. या तुलनेत मराठवाड्यात मात्र या आठवड्यात फारसा पाऊस नाही. छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकेल. मात्र, उर्वरित मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचाच अंदाज आहे..