Home > मॅक्स किसान > Monsoon2023आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार

Monsoon2023आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या उपसागरात कमी दाब निर्माण होणार असल्याने राज्यात आजपासून तीन ते चार दिवस मान्सूनचा जोर वाढणार असल्याचा IMD चा अंदाज आहे.

Monsoon2023आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार
X


राज्यात पुढील आठवड्यात पाऊसात वाढ होईल 19/20 जुलै पासून पुढे बंगालच्या उपसागरावर एक कमी दाब निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण राहणार असल्यामुळे 20ते 23 जुलै राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.जळगाव, धुळे, नंदुरबार ,नाशिक, छत्रपती संभाजी नगर अहमदनगर काही भागात मध्यम पाऊस होईल.

कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात १६ जुलैपर्यंत पावसाची तूट राहणार आहे. प्रतिकूल घडामोडींमुळे येत्या ८ ते १२ जुलै दरम्यान राज्यात मान्सून सक्रीय नसेल.

परिणामी येत्या काही दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट तसेच मराठवाडा आणि विदर्भातील पावसाचा जोर कमी राहिले. मात्र १२ ते १३ जुलैदरम्यान पुन्हा तीन ते चार दिवस महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढेल, असं हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितलं होतं.

24/25 जुलै नंत्तर बंगालच्या उपसागरावर पुन्हा तीव्र कमी दाब निर्माण होणार असल्यामुळे राज्यात काही भागात काही पाऊस वाढेल. जुलै च्या शेवटी पुन्हा तीव्र कमी कमी दाबाचा पट्टा (WML )निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात मध्य भागात तीव्र पाऊस होण्याची शक्यता आहे.

जुलै मध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल. ऑगस्ट एल निनो तीव्र होणार असला तरी हिंदी महासागरावर iod देखील जुलै पासून पॉजिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार आहे, असे हवामान अभ्यासक शेतकरी विजय जायभाये यांनी सांगितलं.

राज्याचा पाऊस पाणी ( हवामान तज्ञ माणिकराव खुळे)

शुक्रवारपासून (१४ जुलै) राज्यात मध्यम पावसाची सुरुवात

1.

"शुक्रवार दि.१४ जुलैपासून खान्देश, नाशिकपासून ते सांगली, सोलापुर पर्यंतच्या १० जिल्ह्यात आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील ५ दिवस म्हणजे सोमवार दि.१७ जुलैपर्यन्त मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे"


2. "मराठवाड्यात केवळ तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे"


"कोकणात चालु असलेला पावसाची तीव्रता तीव्रता तशीच टिकून राहील'

3.

"महाराष्ट्रात आतापर्यंत भाग बदलत झालेल्या पावसामुळे ८ इंचापर्यंतच्या पूर्ण ओलीवर सोयाबीनची पेरणी झाली असुन काही ठिकाणी सध्या चालु आहे'



4.

"जेथे खास ओल नाही तेथे पेरीसाठी वाट पाहण्याचा काळ जरी अंतिम टप्प्यात असला तरी अजुनही वाट पाहण्यास तेथे वाव आहे"


5.

"त्यानंतरही २१ जुलैपासून पावसाच्या शक्यतेमुळे पूर्ण पेर ओलीसाठी वाट पहावीच लागेलशेवटी निर्णय शेतकऱ्यांनीच घ्यावा"




6

बद्री केदारनाथ पर्यटन टाळा

" उत्तर भारतामध्ये बद्री-केदार अजुन आठवडाभर पावसाचा धुमाकूळ असु शकतो. त्यानंतर त्यापुढील १५-२० दिवसापर्यंत तेथील जनजीवन पूर्वपदावर येण्यास काळ लोटला जाईल. तेंव्हा पर्यटकांनी एकूण एक महिन्यापर्यन्त तेथील पर्यटनाचा विचार करू नये"




माणिकराव खुळे

Meteorologist (Retd.)

IMD Pune.

विजय जायभावे हवामान अंदाज

ता. सिन्नर जि. नाशिक दि. 12

जुलै 2023

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈

१.राज्यात या आठवड्यात पुढील पाच सहा दिवस काही भागात मध्यम पाऊस होईल. राज्यात पुढील आठवड्यात पाऊसात वाढ होईल.

२.19/20 जुलै पासून पुढे बंगालच्या उपसागरावर एक कमी दाब निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण राहणार असल्यामुळे 20ते 23 जुलै राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे .


3. 24/25 जुलै नंत्तर बंगालच्या उपसागरावर पुन्हा तीव्र कमी दाब निर्माण होणार असल्यामुळे राज्यात काही भागात काही पाऊस वाढेल. जुलै च्या शेवटी पुन्हा तीव्र कमी कमी दाबाचा पट्टा (WML ) निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात मध्य भागात तीव्र पाऊस होण्याची शक्यता आहे.



4.जुलै मध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. ऑगस्ट एल निनो तीव्र होणार असला तरी हिंदी महासागरावर iod देखिल जुलै पासून पॉजिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार आहे.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

5.उत्तर महाराष्ट्र 12 जुलै

जळगाव, धुळे, नंदुरबार ,नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर काही भागात मध्यम पाऊस होईल.



६.जळगाव, संभाजी नगर, अहमदनगर, नाशिक भागात पाऊस जळगाव,धुळे संपूर्ण नाशिक, अहमदनगर, धुळे,नंदुरबार सर्वत्र 12/13/14 जुलै पर्यंत मध्यम पाऊस पडेल 16/17/18 जुलै नंत्तर हळूहळू पाऊसात वाढ होण्याची शक्यता आहे. 20/23 जुलै पावसाचा जोर वाढेल.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

७.कोकण

कोकण, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी,ठाणे, मुंबई, पालघर पासून काही भागात कमी अधिक पाऊस पाऊस होईल. 14/15 16/17 जुलै रोजी पाऊस होईल. 20ते 25 जुलै मुसळधार पाऊस होईल.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

८.मध्य महाराष्ट्र

पुणे, सातारा, कोल्हापूर ,सोलापूर,सांगली पुढील दोन दिवस पाऊस पडेल. तसेच 12 जुलै या भागात काही ठिकाणी पाऊस होईल. 14/15/16 जुलै पाऊस या भागात देखिल वाढेल पुढील आठवड्यात पाऊस वाढेल .


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

9

मराठवाडा 12 जुलै

पुढील दोन दिवस लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड,धाराशिव ढगाळ वातावरण राहून किरकोळ सरीसह काही भागात होतील. 15/16 जुलै पर्यंत काही भागात किरकोळ पाऊस राहील.19/20/21/22/23 जुलै नंतर काही भागात पाऊस वाढलेला राहील.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

10

विदर्भ 12 जुलै

पूर्व विदर्भ, नागपूर ,गोंदिया,वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर,गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाना, वाशीम काही ठिकाणी पाऊस होईल 13/14/15 जुलै विदर्भात पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.




Updated : 12 July 2023 4:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top