मिडीयाकडून महागाईच्या नावावर शेतमालाची बदनामी
वाणिज्य मंत्रालयाकडील रिपोर्टनुसार फेब्रुवारी महिन्यासाठी देशात भाजीपाल्याला किंमतवाढीचा वार्षिक दर 6.2 टक्क्यांनी घसरला आहे. तरीही झी बिझनेस, एनडीटीव्ही, मिंट, इकॉनॉमिक टाईम्स आदींनी फेब्रुवारी महिन्यातील रिटेल महागाई दराची बातमी देतांना भाजीपाल्याचे फोटो का टाकले आहेत? भाजीपाला उत्पादक फोटो मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून आता सह्यांची मोहिम राबविली जाणार आहे
X
एनडीटीवीच्या हेडिंगमध्ये म्हटलेय की फेब्रुवारीत अन्न आणि इंधन महागाई वाढलीये...पण फोटो इंधनाचाही नाही, तर टोमॅटोचा टाकलाय. वस्तूस्थिती अशी की संपूर्ण फेब्रुवारी-मार्चमध्ये टोमॅटोच्या रिटेल आणि फार्मगेट दोन्ही किंमती नीचांकी पातळीवर आहेत. मीडियाने एखाद्या ब्रॅंडचा प्रतिकात्मक का होईना, चुकीचा फोटो टाकला तर नुकसान भरपाईचे दावे दाखल झाले आहेत. पण, टोमॅटो आणि एकूणच शेतमालाच्या बाबतीत असे होणार नाही. कारण इथे कुणीही येऊन टपली मारू शकतो.
झी बिझनेसने तर संपूर्ण F&V बास्केटचा फोटो टाकला आहे. 3.8 टक्क्यापर्यंत फूड महागाई शूट अप झालीये असे म्हटलेय. भारतासारख्या देशात अन्नधान्य प्राईस इंडेक्स किमान तीन चार टक्के वाढला तरी तरी शेतकऱ्याला परवडणारे नाही, कारण एकूण महागाईच्या दराच्या तुलनेत तीन-चार टक्के अन्नधान्य दरवाढ फार नाही.
भाजीपाला किंमतवाढ दर उणे 6.2 टक्के
वाणिज्य मंत्रालयाकडील रिपोर्टनुसार फेब्रुवारी महिन्यासाठी देशात भाजीपाल्याला किंमतवाढीचा वार्षिक दर 6.2 टक्क्यांनी घसरला आहे. तरीही झी बिझनेस, एनडीटीव्ही, मिंट, इकॉनॉमिक टाईम्स आदींनी फेब्रुवारी महिन्यातील रिटेल महागाई दराची बातमी देतांना भाजीपाल्याचे फोटो का टाकले आहेत? भाजीपाला उत्पादक फोटो मागे घेण्यासाठी सह्यांची मोहिम राबवणार आहे, असे कृषी अभ्यासक दीपक चव्हाण यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं.