Home > मॅक्स किसान > यांत्रिकीकरणाचा वापर करीत शेतकऱ्याने फुलवली शेती

यांत्रिकीकरणाचा वापर करीत शेतकऱ्याने फुलवली शेती

यांत्रिकीकरणाचा वापर करीत शेतकऱ्याने फुलवली शेती
X

आताच्या काळात शेती करणं हे अवघड झाल्याच्या चर्चा अनेक शेतकरी करतात. मात्र, या चर्चांना फाटा देत वर्धा जिल्ह्यातील सुकळी या गावातील युवा शेतकरी मनोज पोकळे यांनी 20 एकर शेतात यांत्रिकीकरणाची जोड घेत भाजीपाल्यापासून ते पाच ते सहा उत्पन्न ते घेत असतात. यामध्ये कपाशी, तुर, तसेच वांगी अशा पिकांचे ते उत्पन्न सुद्धा घेत असतात. हे पीक घेत असताना त्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले त्यामध्ये त्यांनी यांत्रिकीकरणांमध्ये भर देत विविध योजनांचा लाभ घेतला. काळानुरूप शेती पध्दतीमध्ये मोठे बदल होत आहेत. आधुनिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे आता उत्पादनवाढीसह शेती फायद्याची होत आहे. कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यावर मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरू शकतो याचं उत्तम उदाहरण हे युवा शेतकरी ठरत आहे.

Updated : 13 Oct 2023 7:01 PM IST
Next Story
Share it
Top