Home > मॅक्स किसान > रसदार सीताफळाची बाजारात प्रतीक्षा

रसदार सीताफळाची बाजारात प्रतीक्षा

उशिरा पावसाने सिताफळाच्या गुणवत्तेला फरक पडला असून बाजारात अजूनही गुणवत्तापूर्ण सीताफळाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे.

रसदार सीताफळाची बाजारात प्रतीक्षा
X

राज्यात उशिरा पाऊसाला सुरुवात झाल्यामुळे त्याचा थेट परिमाण सिताफळावर झाला आहे. यावर्षी बाजारात दाखल होणारे सीताफळ ९० टक्के आकाराने लहान तर १० टक्के मोठ्या आकाराची दाखल होत आहेत. त्यामुळे दर्जेदार उत्पादनासाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.मागील वर्षी घाऊक बाजारात प्रतिकिलो सीताफळाला ५०-२०० रुपये दराने विक्री होती, परंतु आता ३० - १२० रुपयांवर विक्री होत आहे. बाजारात सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत सीताफळाचा हंगाम असतो. मात्रऑगस्ट महिना संपुष्टात आला. तुरळक पावसाच्या सरी बरसत असल्याने त्याचा सीताफळ पिकावर परिणाम होत आहे.पावसाच्या नैसर्गिक पाण्याने सीताफळ वाढ अधिक चांगली होते मात्र ह्या वर्षी रसदार सीताफळ बाजारात आले नसल्यामुळे ग्राहकांना रसदार सीताफळाची प्रतीक्षा करावी लागत आहे





Updated : 11 Sept 2023 5:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top