लिंबूची मागणी घटल्याने दहा रुपये किलो लिंबाचा भाव
X
उन्हाळ्यात लिंबूची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने लिंबूला भाव चांगला मिळत होता. परंतु आता पाऊस सुरू झाल्याने लिंबूची मागणी त घट झाल्याने चोपड्यातील शेतकऱ्यांकडून व्यापारी दहा रुपये किलोने मागणी करीत आहेत. वीस किलोचे लिंबूचे कॅरेट दोनशे रुपयाला द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात हेच कॅरेट बाराशे ते तेराशे रुपयाला जात होते. आता त्यामध्ये झाडावरून लिंबू तोडण्यासाठी दोनशे रुपये रोजाने मजूर लावावे लागत आहेत. पावसाळा असल्याने झाडावरचे लागलेले लिंबू जमिनीवर मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तोडणी खर्च देखील निघत नसल्याने नाईलाजाने शेतकरी लिंबू दहा रुपये किलोने विकत आहे शेतात 1200 लिंबाची झाड आहेत. यावर्षी फळ मोठ्या प्रमाणावर लागलेले आहेत परंतु भाव नसल्याने शेतकऱ्यांना परवडत नसल्याची खंत लिंबू उत्पादक शेतकरी दीपक धनगर व्यक्त करत आहे.