Home > मॅक्स किसान > मिरचीचा पीक विम्यात समावेश करा

मिरचीचा पीक विम्यात समावेश करा

मिरचीचा पीक विम्यात समावेश करा
X

राज्यातील अनेक भागात मिर्चीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. राज्यात सर्वाधिक मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात दरवर्षी पाच ते सहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात येते यंदाही लागवड करण्यात आली आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती आणि वातावरणाच्या बदलामुले शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसानीला समोर जावं लागत यासाठी मिरची पिकाला पीक विमाच संरक्षण नाही यासाठी ह्या वर्षीपासून पीक विमा संरक्षण द्याव अशी मागणी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

अवकाळी पाऊसामुळे दरवर्षी मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती आणि वातावरण बदलाचा मोठा फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागते. शासनाच्या १ रुपयात पीक विमा योजनेत मिरची नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे नुकसान झाल्यास पीक

विमा नसल्याने मदत मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे मिरचीचा पंतप्रधान पीक विमा योजनेत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. मात्र कृषी विभाग मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

यंदा मिरचीच्या लागवड क्षेत्रात वाढ:

मागील वर्षी उत्पादनात घट होऊनही मिरचीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. गेल्या वर्षी मिळालेले दर लक्षात घेता यंदा मोठ्या प्रमाणात लागवड झाली. विमा संरक्षण नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

मिरची संशोधन केंद्र सुरू करा: गोवाल पाडवी

मिरचीवर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. दरवर्षी वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट येते. राज्यात द्राक्ष, केळी, ऊस उत्पादक जिल्ह्यात उत्पादन वाढीसाठी संशोधन केंद्र सुरू केले आहेत. मिरची उत्पादक जिल्हा असूनही नवीन वाणांचे संशोधन यासाठी मिरची संशोधन केंद्र सुरू करावे, अशी मागणी नंदुरबार चे खासदार गोवाल पाडवी यांनी केली आहे.

Updated : 13 July 2024 3:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top