Home > मॅक्स किसान > यंदाचं पाऊस पाणी काय म्हणतयं ? IMD Predictions for Monsoon 2023

यंदाचं पाऊस पाणी काय म्हणतयं ? IMD Predictions for Monsoon 2023

देशाचा आर्थिक विकास आणि आणि शेतीचं भवितव्य ठरवणारा यंदाचा मॉन्सून (Monsoon) सर्वसाधारण (नॉर्मल) राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD- आयएमडी) ने आज जाहीर केला आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत ९६ टक्के पाऊस पडेल, असे आयएडीने म्हटले आहे.

यंदाचं पाऊस पाणी काय म्हणतयं ? IMD Predictions for Monsoon 2023
X


आयएमडीचा पावसाबद्दलचा अंदाज ढोबळमानाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानला जात असला तरी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढवणारा आहे. कारण आयएमडीच्या अंदाजानुसार पश्चिम-मध्य भारतात सरासरीपेक्षा कमी (Below Normal) पाऊस होईल असं म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा व खानदेशचा काही भाग या पट्ट्यात येतो. तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागाचा त्यात समावेश होतो. एकंदर देशातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक पट्ट्यात यंदा पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

अर्थात आयएमडी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनचा अद्ययावत अंदाज जाहीर करणार आहे. त्यामध्ये पावसाबद्दलचे चित्र आणखी स्पष्ट होईल.

आयएमडीचा अंदाज ढोबळमानाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानला जात असला तरी महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujrat) आणि मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढवणारा आहे. कारण आयएमडीच्या अंदाजानुसार पश्चिम-मध्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.

सोयाबीन-कापूस उत्पादक पट्ट्यात कमी पाऊस?

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील व खानदेशचा काही भाग पश्चिम-मध्य भारतात येतो. तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागाचा या पट्ट्यात समावेश होतो. एकंदर देशातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक पट्ट्यात यंदा पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

दरम्यान, यंदा देशात मॉन्सून सर्वसाधारण (Normal) राहील, असा अंदाज आयएमडीने मंगळवारी (ता. ११) जाहीर केला. यंदा सरासरीच्या तुलनेत ९६ टक्के पाऊस पडेल, असे आयएडीने म्हटले आहे.

यंदाच्या मॉन्सूनमध्ये एल-निनोची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. एल-निनोचा परिणाम जुलैनंतर दिसून येईल, असे आयएमडीने म्हटले आहे.परंतु एल-निनोच्या बाबतीत आयएमडीने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. एल-निनो आला म्हणजे पाऊस कमीच पडणार, असे समजणे चुकीचे आहे.

१९५१ ते २०२२ या कालावधीतील एल-निनो वर्षांपैकी ४० टक्के वर्षांमध्ये सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, असे आयएमडीने म्हटले आहे.दरम्यान, स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पाऊस होण्याचा अंदाज सोमवारी (ता. १०) वर्तवला होता.

दीर्घकालिन सरासरीच्या ९४ टक्के पाऊस होईल, तसेच महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील, असे स्कायमेटने म्हटले होते.

IMD चे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी केलेलं विश्लेषण: यंदाचा पावसाळा सरासरी इतकाच '

१- भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या अंदाजानुसार येत्या जून ते सप्टेंबर ४ महिन्याच्या दिर्घ कालावधी सरासरी नुसार देशात सरासरी इतका म्हणजे ९६ % ± ५ पावसाची शक्यता वर्तवली आहे. म्हणजे देशात ह्या वर्षी सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता जाणवते.

देशात ९६ ते १०४% श्रेणीत पडणारा पाऊस हा सरासरी पाऊस मानला जातो.

२- महाराष्ट्रातही येत्या जून ते सप्टेंबर ४ महिन्यात 'टरसाइल' प्रकारनुसार सरासरी पेक्षा जरी कमी पावसाची शक्यता दर्शवत असली तरी उत्कृष्टपणे पावसाचे वितरण झाल्यास तो सरासरी इतकाच पाऊस होण्याच्या शक्यतेची स्थिती जाणवेल.

३-नकारात्मक शक्यतेच्या अंकानुसार जरी विचार केला तरी ही शक्यता (९६-५) ९१% जाणवते कि जी सरासरीपेक्षा कमी पावसाची आहे. तरी देखील टंचाईसदृश अवस्थेची परिस्थिती येत नाही. म्हणजेच दुष्काळाची शक्यता जाणवत नाही.

४- पावसाळ्याच्या कालावधीत विकसित होणारा 'एल -निनो' पण त्याचबरोबर भारतीय महासागरात विकसित होणारी धन ' भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ' (पॉझिटीव्ह इंडियन ओशन डायपोल) ह्या अवस्था एकमेकांना काटशाह देऊन देशाला सरासरी इतका पाऊस देण्याची शक्यता जाणवत आहे.

५-प्रॉबॅबिलीटीच्या भाषेत सर्वाधिक 'भाकित संभाव्यता ' ही ३५ % तर सर्वाधिक 'हवामान संभाव्यता' ही ३३% आहे.

६- 'भाकीत शक्यता' म्हणजे ह्या संपूर्ण २०२२-२३ वर्षात जागतिक पातळीवरून भाकीतासाठी आवश्यक असलेली सर्व गोळा केलेली निरीक्षणे व त्यावरून ठरवलेली शक्यता होय. तर 'हवामान संभाव्यता' म्हणजे भाकीतासाठी आतापर्यंत उपलब्ध असलेल्या डेट्यावरून ठरवलेली शक्यता होय.

७- मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात ११,१३,१४ एप्रिलला अवकाळी वातावरणाबरोबर गारपीटीची शक्यता जाणवते..

Updated : 11 April 2023 2:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top