Home > मॅक्स किसान > विदर्भ आणि कोकणात जोरदार पाऊस : या जिल्ह्यांना दिला अलर्ट

विदर्भ आणि कोकणात जोरदार पाऊस : या जिल्ह्यांना दिला अलर्ट

विदर्भ आणि कोकणात जोरदार पाऊस : या जिल्ह्यांना दिला अलर्ट
X


Mansoon Apdet : बांगालच्या उपसागारात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने राज्यात पाऊसाचा जोर कायम आहे. विदर्भातील भंडारा चंद्रपूर रत्नागिरी आणि कोकणचा घाटमाथ्यावर रेड अलर्ट चा ईशारा भारतीय हवामान विभागाने IMD दिला आहे.

मुंबई Mumbai पट्ट्यात ही पाऊसाचा ऑरेंज अलर्ट आहे.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊसाची श्यक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम ते मुसळधार पाऊससाचा ईशारा भारतीय हवामान विभागाणे दिला आहे.

तसंच गडचिरोली, गोंदिया, वाशीम जिल्ह्यांमध्ये भंडारा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, चंद्रपूर, अमरावती येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाणे वर्तवली आहे.

तर अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे

हवामान विभागाचा असा आहे अलर्ट :

रेड अलर्ट जिल्हे -

कोकण घाटमाथा,रत्नागिरी, चंद्रपूर.भंडारा

ऑरेंज अलर्ट जिल्हे :

ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरेली.

येलो अलर्ट जिल्हे :

मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, भंडारा, गोंदिया.

Updated : 20 July 2024 3:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top