कोकण, विदर्भात पुन्हा जोरदार पाऊस : या जिल्ह्यांना अलर्ट
X
Monsoon Rain :राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र पूरक असल्याने राज्यात पावसाचा जोर कायम आहे आज पुन्हा कोकण, तसंच घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा Orenj Alrt हवामान विभागाने IMD ने दीला आहे.तर मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात तूरळ ठीकानी जोरदार पाऊसाचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्मान झाले आहे.
तर गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दीला आहे
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा तसेच गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' आहे. तर ठाणे, मुंबई, कोल्हापूर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा 'येलो अलर्ट' आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.
या जिल्ह्यात अलर्ट :
ऑरेंज अलर्ट :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
येलो अलर्ट:
ठाणे, मुंबई, कोल्हापूर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, भंडारा
बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ.