Home > मॅक्स किसान > Monsoon 2023 : मुंबई कोकण पट्टीसह पुढील पाच दिवस अति पावसाचे

Monsoon 2023 : मुंबई कोकण पट्टीसह पुढील पाच दिवस अति पावसाचे

महाराष्ट्र मध्ये पुढील पाच दिवस पावसाचे असून मुंबई कोकणपट्टीसह राज्यात सर्व दूर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिला आहे.

Monsoon 2023 : मुंबई कोकण पट्टीसह पुढील पाच दिवस अति पावसाचे
X

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.



3 Jul,10.30,Very active monsoon condition over west coast as expected from S Maharashtra to Kerala.



कोकणामध्ये पावसाचा जोर सातत्यपूर्ण असून, कोकण आणि गोवा विभागातील पाऊस सरासरी इतका झाला आहे.

येत्या आठवड्यात पावसाचा जोर कोकण विभागात वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ही तूटही लवकरच भरून निघेल अशी अपेक्षा आहे.आत्तापर्यंत देशभरात केवळ मराठवाडा विभागामध्ये पावसाची सर्वाधिक तूट नोंदली गेली आहे. या भागामध्येही पुढील आठवड्यापासून पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे शुक्रवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २४ तासांमध्ये २० सेंटीमीटरहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्गात बुधवारी पावसाचा जोर वाढू शकेल तर नंतर गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.





मुंबईमध्ये शहर आणि उपनगरामध्ये आणि कोकणासह पालघर जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीमध्ये पुणे, कोल्हापूर, सातारा घाट परिसरामध्येही तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड येथे पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

जूनअखेरपर्यंत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट होती. रायगडमधील पाऊस आता सरासरीच्या श्रेणीत आला आहे. तर रत्नागिरीमध्ये ३६ टक्के आणि सिंधुदुर्गात ३७ टक्के पावसाची तूट आहे. पालघरमध्ये ४२ टक्के अतिरिक्त आणि ठाणे जिल्ह्यामध्ये२४ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. या अतिरिक्त पावसामुळे दक्षिण कोकणातील तुटीची कसर भरून निघाली आहे.

मराठवाड्यातही प्रमाण वाढणार

उर्वरित राज्यामध्ये पाऊस दिलासा कधी मिळणार, या प्रश्नासंदर्भात उत्तर देताना पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी, जुलैमध्ये राज्यात पावसाचे वितरण चांगले असेल अशी माहिती दिली.

पुढच्या तीन आठवड्यांमध्ये मराठवाड्यातही पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज मॉडेलवरून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. मात्र पेरणीसाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.




आजपासून ५ दिवस जोरदार पाऊस

कोकण आणि विदर्भ

"मुंबई उपनगर आणि शहर सोबत कोकणातील उर्वरित ५ आणि विदर्भातील ११ जिल्ह्यात अतिजोरदार पाऊस पडणार"

माणिकराव खुळे

Meteorologist (Retd.)

IMD Pune..




मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा

"संपूर्ण खान्देश आणि नासिक पासून सांगली, सोलापूर पर्यंतच्या १० आणि मराठवाड्यातील ११ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाउस पडणार"

माणिकराव खुळे

Meteorologist (Retd.)

IMD Pune..

"पूर्वोत्तर ७ आणि उत्तराखंड, केरळ, कर्नाटक राज्यात अति जोरदार पाऊस"

माणिकराव खुळे

Meteorologist (Retd.)

IMD Pune..


Updated : 4 July 2023 10:09 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top