Happy news Farmers शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी...
अवकाळी पाऊसाचा मान्सूनवर परिणाम नाही - IMD
X
भर उन्हाळ्यात ऋतुचक्र बदलल्याने climate cheng गेल्या तीन महिन्यांपासून अवकाळी पाऊस वादळी वारा आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोक चिंताग्रस्त आहेत. हीच परिस्थिती राहिली तर मान्सून मध्ये बदल होऊ शकतो एन पावसाळ्यात पाऊस येणार नाही शेतकऱ्यांना खरीप पेरण्यां योग्य वेळी होणार की नाही याची चिंता सतावत आहे. यंदाचा हंगाम होणार का नाही याचीही भीती शेतकऱ्यांना आहे.
एन उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने काही दिवसांनी मार्गस्थ होणाऱ्या मान्सूनवर याचे काय परिणाम होणार याबाबतची स्पष्ट माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
जागतिक स्तरावरील हवामान संस्था अल निनोच्या परिणामांसाठी तयार राहा असे इशारे देत आहे मात्र भारतीय मान्सूनवर त्याचे परिणाम होणार नाही शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी चिंता करू नये असं सांगत भारतीय हवामान विभागाने IMD मोठा दिलासा दिला आहे
उन्हाळ्यात पावसानं आणि गारपीटन थैमान घातल आहे यामुळे पावसाळ्यात नेमके कसं वातावरण राहील याची चिंता लागलेली असतानाच अवकाळी पाऊस आणि मान्सूनचा पाऊस mansun rain हे दोघे वेगवेगळे विषय असल्याचं हवामान विभागा IMD कडून स्पष्ट केल आहे. म्हणजे गेल्या महिन्यातच भारतीय हवामान विभागाने यंदाच्या वर्षी 96 टक्के पाऊस असा सर्वसामान्य पाऊस होणार आहे अल निनोच्या Elnino प्रभावातही मान्सून घटणार नाही असं निरीक्षण हवामान विभागाने IMD वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने काही प्रमाणात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमधील अवकाळी पाऊस येणाऱ्या मान्सूनचा पाऊस यातील संभ्रम दूर केला आहे यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.