मिरची ची आवक वाढताच भाव कमी
X
नंदुरबार जिल्हा देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ म्हणून ओळखला जातो . या बाजारात मिरच्यांची मोठी आवक आल्याने मिरचीचे दर कोसळले आहेत.त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदाच्या मोसमातील लाल मिरच्यांची सर्वाधिक आवक नंदूरबारच्या प्रसिद्ध मिरची बाजारात आली आहे.
नंदुरबार बाजार समितीत आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. पुढील दीड महिना मिरचीची आवक अशीच सुरू राहण्याचे अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. मिरचीची आवक जादा असल्याने मिरचीचा दर घसरला आहे. आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे बाजार समितीतील खरेदी विक्रीच्या व्यवहार बंद होता. मात्र गेल्या सोमवारपासून पुन्हा बाजार समिती सुरू झाली आहे. मात्र जादा आवक झाल्याने मिरचीचे दर घसरले आहेत. सध्या मिरचीला फक्त दोन हजार पासून ते चार हजारपर्यंतचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यात नाराजी आहे.
यंदाच्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणातही यंदा येथे मोठ्या प्रमाणात मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतीत यंदा मिरचीची विक्रमी आवक आली आहे. आतापर्यंत दोन लाख क्वींटल पेक्षा जास्त मिरच्यांची खरेदी येथे झाली आहे. पुढील दीड महिने मिरच्याचा आवक सुरुच रहाणार असल्याचा अंदाज आहे. मिरचीचा पुरवठा जादा झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. आधीच यंदाच्या अनियमित पावसाने शेतकरी आधीच संकटात असताना आता मिरचीच्या विक्रीतून खर्चही वसुल होत नसल्याने शेतकऱ्यांचं म्हणणं आहे .
सध्या मिरचीला फक्त दोन ते चार हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मिरचीच्या लागवडीसाठी त्यानंतर फवारणी आणि काढणी तसेच वाहतूकीचा खर्च मोठा आहे. परंतू त्याप्र्माणात भाव मिळत नसल्याचे शेतकरी नाराज आहे. यामुळे केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मिरची पावडरला चांगला भाव मिळतो. मग शेतकऱ्यांच्या मिरचीला का नाही .