Grape Rate: द्राक्ष उत्पादकांसाठी हंगाम 'गोड कि आंबट':
यंदा प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बागा जगवल्या,यंदा राज्यातील उत्पादनात घट असूनही भावात उठाव दिसून येत नाही. त्याचा परिणाम द्राक्षाच्या दरावर सुरवातीलाच दिसून येतोय.
X
Grape Rate: द्राक्ष उत्पादकांसाठी हंगाम 'गोड कि आंबट':
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये द्राक्षाला प्रतिकिलोस 60 ते 80 रुपयांपर्यंत दर पोहचले होते. मात्र, यंदा हंगामाच्या प्रारंभीच द्राक्षाला प्रतिकिलोस 30 ते 45 रुपये दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच दर दबावात आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडला आहे. त्यामुळे येत्या काळात द्राक्षाचे दर वाढणार का याकडे द्राक्ष उत्पादकांचे लक्ष आहे.
नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पावसाच्या संकटातून यंदाचा द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे नुकसान झाले. त्यातच धुके, ढगाळ वातावरणाचा फटका तयार द्राक्ष बागांना बसला. मण्यांवर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला.
सध्या द्राक्षाला प्रति किलोस 30 रुपयांपासून 45 रुपये असा दर मिळत आहे.
हंगामाच्या प्रारंभीच द्राक्षाचे दर अपक्षेपेक्षा कमी आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.उत्पादकांसाठी यंदाचा द्राक्षाचा हंगाम गोड कि आंबट राहणार अशी शंका असली तरी काही दिवसात द्राक्षाला चांगला भाव मिळेल अशी आशा ही द्राक्ष उत्पादकंना आहे.