Home > मॅक्स किसान > अमूल पाठोपाठ गोकुळने गाईच्या दुधाचे दर वाढवले...

अमूल पाठोपाठ गोकुळने गाईच्या दुधाचे दर वाढवले...

अमूल पाठोपाठ गोकुळने गाईच्या दुधाचे दर वाढवले...
X

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात वाढ करावी यासाठी सद्या आंदोलन सुरु आहेत. काही ठिकाणी दूध फेकून आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे अमूल पाठोपाठ गोकुळने गाईच्या (Gokul Dairy) दुधाचे दर वाढवले आहेत. मुंबईसह पुणेकरांसाठी ही वाढ कारण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाच्या विक्रीत प्रति लिटर 2 रुपयांनी दरवाढ (Milk Rate Hike ) केलीय.

गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक मोठी मागणी आहे. गोकुळ दूध संघाने ही दरवाढ मुंबई आणि पुण्यात केली आहे. ह्या जुलैपासून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर ग्राहकांनासाठी दोन रुपयांनी महाग झालंय. त्यामुळे पूर्वी गोकुळचे गायीचे दूध 54 रुपये प्रति लिटर होतं ते आता 56 रुपये मोजावे लागणार आहे.

मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल 3 लाख पेक्षा जास्त लिटर विक्री तर पुण्यात भागात 40 ते 50 हजार लिटर दूधाची विक्री होते. या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, मात्र ग्राहकांचे बजेट मात्र बिघडणार आहे. ही दरवाढ मुंबई आणि पुण्यातच करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रत ही दरवाढ करण्यात येणार नाही, असं गोकुळ दूध संघाकडून सांगण्यात आलंय.

दरम्यान दूधाला 35 रुपये दर घोषित करण्यात आल्याच महसूल मंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात घोषित केलं होतं. दूधाला 40 ते 45 रुपये रुपये भाव मिळावा म्हणून राज्यातील शेतकरी अजूनही आक्रमक झाले आहेत तसंच आंदोलनाची अधिक तीव्र भूमिका कायम ठेवली आहे.

सातत्याने महागाई वाढत असताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसलाय. काही दिवसांपूर्वी अमूल (Amul Dairy ) दुधाचे दर वाढ केली आहे. त्यापाठोपाठ गोकुळ डेअरी नेही दर वाढ केली आहे.

किरकोळ बाजारात सामान्य ग्राहक ज्यावेळी दूध घ्यायला जातो त्यावेळी दूधाचे बाजारभाव सध्या प्रति लिटर 80 ते 90 रुपये आहे. तर गोकुळ दूध एक लिटर 72 रुपयांना मिळत आहे. मदर डेअरीचे एक लिटर दूध 76 रुपये तर अमूल दूध 68 रुपयांना विकले जात आहे.

Updated : 7 July 2024 9:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top