Home > मॅक्स किसान > मुंबईत पार पडणार जागतिक हळद परिषद

मुंबईत पार पडणार जागतिक हळद परिषद

जगाच्या मार्केटमध्ये अव्वल असलेल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचा दबदबा आहे. हळद उद्योगातील भविष्याच्या संधींचा वेध घेण्यासाठी शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादक निर्यातदार यांच्यासोबत महत्त्वाची जागतिक हळद परिषद येत्या बुधवारी(ता.24) मुंबईत पार पडणार आहे.

मुंबईत पार पडणार जागतिक हळद परिषद
X

जगाच्या मार्केटमध्ये अव्वल असलेल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचा दबदबा आहे. हळद उद्योगातील भविष्याच्या संधींचा वेध घेण्यासाठी शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादक निर्यातदार यांच्यासोबत महत्त्वाची जागतिक हळद परिषद येत्या बुधवारी(ता.24) मुंबईत पार पडणार आहे.





27 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईमध्ये पहिली जागतिक हळद परिषद पार पडणार आहे. या परिषदेमध्ये प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), व्यापारी, प्रक्रिया करणारे, निर्यातदार, संशोधक आणि हळद पिकाशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हळद परिषदेचे उद्घाटन होणार असून हळद मूल्य साखळीतील एफपीओ, व्यापारी, प्रोसेसर आणि निर्यातदार उपस्थित असतील.यावेळी खासदार हेमंत पाटील देखील उपस्थित राहणार आहेत.

एनसीडीईएक्स समूहाच्या एनआयसीआरद्वारे ही परिषद आयोजित केली जात आहे. हळद उद्योगाच्या उत्पादन, मार्केटिंग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यासारख्या विविध पैलूंवर मंथन करणारी ही परिषद पार पडणार आहे आहे. हळद लागवडीतील नवीन पद्धती त्याचबरोबर हळद निर्यात उद्योगाचा आढावा देखील या परिषदेत घेतला जाणार आहे.

"हळद उद्योगाची ही दीर्घकाळापासून प्रलंबित मागणी होती की एक सर्वसमावेशक व्यासपीठ असावे जेथे सर्व भागधारकांना पीक आणि औद्योगिक वस्तू म्हणून हळदीशी संबंधित सर्व मुद्द्यांवर भेटण्याची आणि चर्चा करण्याची संधी असेल. आम्ही याबद्दल खूप आशावादी आहोत. हा उपक्रम आणि नजीकच्या भविष्यात या उद्योगावर कार्य करण्यासाठी मौल्यवान संधी प्राप्त होईल असा विश्वास आहे," अरुण रास्ते, संचालक, NICR म्हणाले.



नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रक्रिया पद्धती आणि इनपुट डेव्हलपमेंट हळद व्यवसायात कशी क्रांती घडवत आहेत यावरही या परिषदेत प्रकाश टाकला जाईल. हवामानाच्या परिस्थितीचा पीक लागवडीवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो आणि परिषदेत हळद लागवडीवरील त्यांच्या प्रभावाबद्दल उहापोह होईल. हळदीच्या नवीन संधींचा शोध घेईल, जिथे हळद क्षेत्रातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कल्पनांवर देखील परिषदेमध्ये विचार मंथन केलं जाईल. हळद लागवडीत या पूर्वी आंध्र प्रदेशची मक्तेदारी होती. त्यापासून तेलंगणा विभक्त झाल्यानंतर तेलंगणांमध्ये गेल्या वर्षी ५६ हजार ५८९ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होती. महाराष्ट्रात नोंद घेण्यास सुरुवात झाल्यानंतर २०१९-२०मध्ये हळद लागवड क्षेत्र ५४ हजार ८८५ हेक्टरवर पोहोचले आता थेट ८४ हजार हेक्टर क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र देशात हळद लागवडीत अव्वल ठरला आहे. - उत्पादकतेत दुसऱ्या स्थानी लागवड क्षेत्रात महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र २६.१ टन प्रति हेक्टर उत्पादकतेच्या माध्यमातून बिहार पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राची उत्पादकता २०.३ टन प्रति हेक्टर असून, उत्पादकतेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.

हळद भारतात कुठे?

भारत हा जगातील सर्वांत मोठा हळद लागवड करणारा, हळद उत्पादन करणारा आणि निर्यातदार देश आहे. चीन, म्यानमार, नायजेरिया आणि बांगलादेशामध्येही हळदीची लागवड केली जाते. जगातील हळदीखालील क्षेत्राचा विचार केल्यास मुख्य क्षेत्र भारत असून, जगातील एकूण लागवडीपैकी ८२ टक्के लागवड एकट्या भारतात होते. त्याखालोखाल चीनमध्ये आठ टक्के, म्यानमारमध्ये चार टक्के, नायजेरियात तीन टक्के आणि बांगलादेशात तीन टक्के इतके हळदीचे क्षेत्र आहे. आयुर्वेदात हळदीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन चिकित्सा पद्धतीत हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. पारंपरिक उपचार पद्धतीसह करोना साथीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आयुर्वेदिक औषध म्हणून हळदीचा वापर जगभरात वाढला होता. आरोग्यासह हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. हळद भारतीयांच्या जीवनशैलीतील महत्त्वाचा घटक आहे.


हळदीच्या उत्पादन खर्चाचे गणित

साधारणपणे एका एकरात हळद उत्पादन घेण्यासाठी एक लाख २० हजार ते एक लाख ४० हजारांपर्यंत खर्च येतो. एक एकरात सुमारे ३५ क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन निघते. या हळदीला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तरच हळद लागवड करणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. मात्र, सध्या मिळणारा दर अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

हळद बियाण्याचे मार्केटही मोठे

सांगलीचा हळद बाजार जसा प्रसिद्ध आहे, तसाच हळद बियाण्यांचा बाजारही प्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकच्या सीमाभागातून शेतकरी बियाणे खरेदीसाठी सांगलीत येतात. त्यामुळे बाजार समितीत दर वर्षी सुमारे ७०० (एका गाडीत १६ टन बियाणे) गाड्या हळद बियाण्यांची उलाढाल होते. प्रत्येक हंगामात किमान ४०० ते ५०० गाड्या हळद बियाणे विक्री होते. गेल्या वर्षी हळदीच्या बियाण्यांचा दर प्रतिक्विंटल ४००० ते ४२०० रुपये होता. हंगामात ४०० ते ५०० गाड्या म्हणजे ६४०० ते ८००० टन बियाण्यांची विक्री झाली होती. यंदा मात्र, हळदी बियाण्यांची विक्री अत्यंत संथ गतीने होत आहे. सध्या हळद बियाण्यांचा दर २७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.साधारणपणे एका एकरात हळद उत्पादन घेण्यासाठी एक लाख २० हजार ते एक लाख ४० हजारांपर्यंत खर्च येतो. एक एकरात सुमारे ३५ क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन निघते. या हळदीला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तरच हळद लागवड करणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते.


Updated : 24 Sept 2023 2:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top