Home > मॅक्स किसान > जिनिंग प्रेसिंग : गावागावात रेप्लिकेट होईल असे बिझनेस मॉडेल: दीपक चव्हाण

जिनिंग प्रेसिंग : गावागावात रेप्लिकेट होईल असे बिझनेस मॉडेल: दीपक चव्हाण

पिढ्यांपिढ्या आपण कच्चा कापूस विकतोय. ते आता थांबवले पाहिजे. खासकरून शिकलेल्या व उद्यमी शेतकरीपुत्रांनी जिनिंग प्रेसिंगचे तंत्र आत्मसात करून या व्यवसायातल्या संधी साधल्या पाहिजेत असं सांगत आहेत कृषी अभ्यास दीपक चव्हाण जिनिंग प्रेसिंग उद्योजक स्वप्निल कोकाटे यांच्या संवादातून...

जिनिंग प्रेसिंग : गावागावात रेप्लिकेट होईल असे बिझनेस मॉडेल: दीपक चव्हाण
X

स्वप्निल कोकाटे यांचा शिरला -पातूर (जि.अकोला) येथे जिनिंग - प्रेसिंगचा व्यवसाय आहे. कॉटन उद्योगातील बड्या कॉर्पोरेटमध्ये आठ वर्ष नोकरी केल्यानंतर स्वप्निल यांनी जिनिंग प्रेसिंग व्यवसाय सुरू केला. कच्चा कापूस जिनिंग प्रेसिंगद्वारे बेल्स स्वरूपात विकला तर 25 टक्क्यापर्यंत उत्पन्न वाढते. "पिढ्यांपिढ्या आपण कच्चा कापूस विकतोय. ते आता थांबवले पाहिजे. खासकरून शिकलेल्या व उद्यमी शेतकरीपुत्रांनी जिनिंग प्रेसिंगचे तंत्र आत्मसात करून या व्यवसायातल्या संधी साधल्या पाहिजेत," असे स्वप्निल कोकाटे सांगतात.

जिनिंग प्रेसिंग का बंद पडतात, ते मला माहित नाही, पण स्वप्निल कोकाटे (पातूर -अकोला) यांनी बंद पडलेले एक जिनिंग - प्रेसिंगचे युनिट रेंटने (भाडेपट्टा) घेवून काम सुरू केले आणि गेल्या पाच वर्षांत चांगला जम बसवला....त्याबाबत

  1. स्वप्निल यांनी सात वर्ष कॉटन क्षेत्रातील कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पर्चेस विभागात मोठ्या पदावर काम केले. त्यामुळे त्यांना या व्यवसायातील सर्व बारकावे माहिती आहेत.
  2. जिनिंग - प्रेसिंगसाठी फार मोठे वर्किंग कॅपिटल लागते. नवे जिनिंग प्रेसिंग युनिट उभे करणे हे एकट्या-दुकट्या शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणून, स्वप्निल यांनी अतिशय व्यवहारी व प्रुव्हन मार्ग काढला - बंद पडलेले युनिट ताब्यात घेवून जिनिंग प्रेसिंग सुरू केले.
  3. माझ्या परिचयातील विविध क्षेत्रातील बहुतांश यशस्वी उद्योजकांची सुरवात ही त्यांच्या क्षेत्रातील बंद पडलेले युनिट्स सुरू करण्यापासूनच झाली आहे.
  4. आपल्याकडे कुठल्याही व्यवसायाची पूर्ण माहिती न घेता मोठी भांडवली गुंतवणुक करून त्यात ट्रॅप होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. म्हणून त्यांच्यासाठी स्वप्निल कोकांटेचे उदाहरण योग्य ठरेल.
  5. आजही 90 टक्के कापूस उत्पादक कच्चा कापूस विकतात. आपलेच काम आपण जणू काही व्यापारी समूहाला आऊटसोर्स केलेय. एक शेतकरी समाज - समूह म्हणून कमीत कमी प्राथमिक प्रक्रिया करून कॉटन बेल्स विकण्यात आजवर आपल्याला अपयश आले आहे, हे मान्य करावे लागेल.
  6. यावर उपाय काय, तर स्वप्निल कोकाटे यांच्यासारख्या काटेकोर, व्यवहारी पद्धतीने जिनिंग प्रेसिंगचे मॉडेल उभे करणे. एक कापूस उत्पादक पंचक्रोशीत किमान एक तरी मॉडेल उभे राहिले तरी गावातला पैसा गावात रोखण्याची प्रक्रिया सुरू राहील.
  7. उथळ - संवग सक्सेस स्टोरीज आणि हिशोबी जोखीम घेत दीर्घकाळ यशस्वी असणाऱ्या लोकांच्या स्टोरीज यात फरक करायला आपण शिकले पाहिजे.
  8. स्वप्निल कोकाटे सांगतात, त्याप्रमाणे जर आपल्या गावाने एक कोटीचा कच्चा कापूस जिनिंग प्रेसिंग करून विकला तर सव्वा कोटी रूपये घडतात, असे सांगितलेय.
  9. फेसबुक पेजवर स्वप्निल यांच्याशी झालेला संवाद पोस्ट केला आहे. त्याची लिंक https://www.facebook.com/AGROWON/videos/287731722643316/

- दीपक चव्हाण, ता. 28 नोव्हेंबर 2020.

Updated : 29 Nov 2020 9:56 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top