केळी दरात चढ-उतार, प्रति क्विंटल 1000 ते 1500 रुपये भाव...
X
गेल्या काही दिवसांपासून केळी च्या दराबाबत चढ उतार पाहायला मिळत आहे. सद्या केळीला 1000 ते 1500 रुपये एवढा दर मिळत आहे, तर निर्यातक्षम केळीला दोन हजार ते पंचवीशे एवढा भाव मिळतोय. केळीची आवक स्थिर असल्या भावात चढ उतार होत आहेत. दर दोन-तीन दिवसाआड दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ होत आहे. आणि लगेच घटही होत आहे.
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील हालचालींवर खानदेशातील केळीचा बाजारभाव ठरत असतो . मध्य प्रदेशात केळी दरात सतत घट व लागलीच वाढही होत आहे. याचा फायदा व्यापारी घेतात. जेव्हा दरात सुधारणा होते, तेव्हा केळीची थेट किंवा शेत शिवार खरेदी व्यापारी टाळतात. दर कमी झाल्यानंतर खरेदी करतात. या प्रकारामुळे शेतकऱ्यात असंतोष आहे. केळी दराबाबत मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र ने wबऱ्हाणपूर आणि रावेर बाजार समित्यानी समन्वय साधावा अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
केळी सीजन मध्ये खान्देशातून दररोज 400 ते 500 ट्रक आवक होतं असते, मात्र सद्या ला आवक 250 ते 300 ट्रक प्रतिदिन आहे. सध्या खानदेशात फक्त रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा भागात केळी आवक सुरू आहे. म्हणजेच आवक स्थिर आहे