पाच कृषी केंद्राचे परवाने निलंबित;जिल्हा कृषी अधिकारी
कृषी केंद्राची तपासणी केली त्यात कागदपत्रांची अनियमित्ता व त्रुटी आढळून आल्याने पाच कृषी केंद्राचे परवाने निलंबनाची कारवाई केली आहे. तर कीटकनाशक आणि खताच्या असे दोन परवाने रद्द केले आहेत. या कारवाईमुळे कृषी सेवा केंद्रांचे धाबे दणदणले आहेत..
X
सध्या खरीप ( kharip) हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू असून कृषी केंद्र चालकाकडून खत बियाणांची ( fertilzers- seeds)विक्री सुरू आहे. पण काही कृषी केंद्र चालक नियमबाह्य खत बियाणे व कीटकनाशकांची विक्री करत असल्याचे आढळून आल्याने कृषी विभागाने अशा केंद्रावर कारवाईचा बडगा उगारत पाच कृषी केंद्र चालकाचे परवाने निलंबित केले आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार होऊ नये यासाठी खत बियाणे व कीटकनाशकांच्या विक्रीवर करडी नजर ठेवण्यासाठी कृषी विभागाने जिल्हास्तरीय एक तर प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे पथक स्थापन केले असून त्याद्वारे जिल्ह्यातील कृषी केंद्राची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाच्या पथकाने विविध कृषी केंद्राची तपासणी केली त्यात कागदपत्रांची अनियमित्ता व त्रुटी आढळून आल्याने पाच कृषी केंद्राचे परवाने निलंबनाची कारवाई केली आहे. तर कीटकनाशक आणि खताच्या असे दोन परवाने रद्द केले आहेत. या कारवाईमुळे कृषी सेवा केंद्रांचे धाबे दणदणले आहेत, असे नांदेडचे जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बहाटे यांनी सांगितले