Farmer Protest : शेतकरी अंदोलनाची दिशा ठरली
शेतकरी संघटनांच्या बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरली आहे. २३ फेब्रुवारी म्हणजे आज काळा दिवस पाळला जाणार आहे तर २६ फेब्रुवारीला ट्रॅक्टर मोर्चा, १४ मार्चला रामलीला मैदानात आंदोलन होणार असल्यांचं शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आलं आहे.
X
News Delhi - खनौरी सीमेवर बुधवारी झालेल्या एका तरुणाच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यांनी आपला दिल्ली मोर्चा दोन दिवसाकरीता स्थगित केला होता. दरम्यान शेतकरी संघटनांनी एकत्रीत बैठका घेत आपल्या अंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे. त्यानुसार शेतकरी किसान मोर्चा उद्या (२३ फेब्रुवारी) काळा दिवस (Black Day ) पाळणार आहे. तर २६ फेब्रुवारीला ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे आणि १४ मार्चला रामलीला मैदानावर (Ramlila Ground )आंदोलन असे नियोजन शेतकऱ्यांच्या बैठकीत आखन्यात आले आहे.
आंदोलनाच्या १०व्या दिवशी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. २१ फेब्रुवारी रोजी शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये एका शेतकरी तरुण शुभकरन सिंह (Shubhakaran singh) यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गुरुवारी २२ फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी शुभकरन यांचा फोटो काढून घोषणाबाजी केली.
दरम्यानं खनौरी सीमा (Khanauri border )आणि शंभू सीमेवर (Shambhu border) तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकरी संघटनांनी दोन दिवस आंदोलन स्थगित केलं होतं. परंतू आता शेतकरी संघटानांच्या आपआपसात बैठकी पार पडल्यानंतर २३ फेब्रुवारी काळा दिवस पाळला जाणार आहे तर २६ फेब्रुवारी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे १४ मार्च रोजी रामलीला मैदानात आंदोलन करणार असल्याची दिशा या शेतकरी बैठकीत ठरली आहे.