Home > मॅक्स किसान > शेतकरी मित्रांनो, गुप्तधनाच्या आमिषाला बळी पडू नका...

शेतकरी मित्रांनो, गुप्तधनाच्या आमिषाला बळी पडू नका...

आषाढ अमावस्येला गुप्तधनासाठी शेतातील एका पडीत घरात सुरु होता अघोरी प्रकार, मानवी कवटी अन् साहित्य पाहून पोलिसही चक्रावले..

शेतकरी मित्रांनो, गुप्तधनाच्या आमिषाला बळी पडू नका...
X

मानवी खोपडी पत्रावरील छापील देव, कंदमुळे यासह विविध प्रकाराची पूजा मांडून गुप्तधन शोधण्याच्या प्रयत्नातील टोळीचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चाळीसगाव शहरातील नादगरोड भागात एका शेतातील पत्राच्या शेडमध्ये पुजा मांडुन गुप्तधना करीता अघोरी कृत्य करुन जादुटोणा करणार्‍या ९ जणांच्या टोळीच्या चाळीसगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्ररकणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

आषाढी अमावस्या असल्याने सकाळी प्रहरीचे सुमारास चाळीसगाव शहरातील नागद रोड लगत नायरा पेट्रोलपंप समोरील शेतातील पडीत घरात काही इसम गोलाकार स्थितीत खाली बसून त्यामधे मानवी खोपडी व इतर पुजेच्या साहित्यासह अघोरी पूजा करणेकरीता एकत्रित जमणार आहेत. अशी गोपनीय माहिती चाळीसगाव पोलीस ठाण्याचे गस्तीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल टकले, सागर ढिकले यांना कळवून बातमीची खात्री करणेकामी पो. स्टे. नेमणुकीचे पो.ना. राहूल सोनवणे, महेंद्र पाटील, रविंद्र बच्छे, समाधान पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, आशुतोष सोनवणे, चालक नितीन वाल्हे व गणेश नेटके, भरत गोराळकर असे पंचांसह पथक रवाना केले.

याठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार शेतातील पडक्या घरात काही इसम खाली बसून पुजा करताना दिसले. पोलिसांची व पंचांची खात्री होताच छापा टाकुन खाली बसलेल्या दोन मांत्रिकांसह 9 जणांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. संबंधित व्यक्ती गोलाकार स्थितीत खाली बसून त्यामध्ये मानवी खोपडी, लिंबु, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मुर्ती, पिवळया धातूचा नाग, पत्रावरील छापील देव, कंदमुळे, गोलाकार पितळी धातुचे बेरकंगण, केशरी शेदुर, अगरबत्ती पुडा, लोखंडी आडकित्ता व कापुराची पुजा मांडून गुप्त धनाकरिता अघोरी कृत्य करुन जादुटोणा करीत असताना मिळून आले. त्यांच्याकडून अघोरी पूजा करीत असताना एकूण ८ लाख ३५ हजार १०० रु. किमतीचे साहित्य यात आरोपीतांचे मोबाईल फोन, एक टोयोटा युनोव्हा कार क्रमांक ७५५७, व इतर अघोरी पुजा करण्याचे साहित्य असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील यांचे फिर्यादीवरुन गुरनं. ३४२/२०२३, महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटण करणेबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(२) व ३(३) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर ढिकले व प्रकाश पाटील हे करीत आहेत.

Updated : 18 July 2023 9:17 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top