शेतकरी मित्रांनो; पिवळ्या बेडकांचा पाऊस ही अफवा..
खामगावात पिवळ्या बेडकांच्या पावसाची अफवा असल्याचे निसर्ग अभ्यासकांचे स्पष्टीकरण...
X
मान्सूनपूर्व (Premonsoon) पावसादरम्यान पिवळ्या बेडकांचा ( Yellow Frog)पाऊस पडल्याची अफवा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात वाऱ्यासारखी ( Viral News)पसरली. परिसरातील तलाव आणि पाणवठ्यांवर गडद पिवळ्या रंगाचे बेडूक अचानक आढळून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह ( Farmers)सामान्य नागरिकही भयभीत झाले आहेत. सदर बेडूक विषारी असल्याची अफवा असून अशा प्रकारचे बेडूक आढळल्यास अशुभ घडत अश्या अंधश्रध्दा परिसरात आहेत. त्यामुळे या बेडकांबाबत विविध शंका उपस्थित होत आहेत. पाऊस पडल्यानंतर समाधी अवस्थेतून बाहेर पडणारे हे बेडूक अजिबात विषारी ( Poisonous) नाहीत आणि पावसातून बेडूक पडत नाही. मात्र, खामगाव आणि परिसरात आढळून आलेले बेडून उष्मकालीन समाधीतून बाहेर आलेले नर बेडूक आहेत. मिलनोत्सुक असलेले हे बेडूक मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात, पाऊस पडल्यानंतर समाधी अवस्थेतून बाहेर पडणारे हे बेडूक अजिबात विषारी नाहीत. पावसातून बेडूक पडत नाहीत. निसर्गात आढळून येणारे सर्वच बेडूक हे विषारी नसतात. मात्र, पावसाळ्यात आढळून येणारे काही बेडूक विषारी असू शकतात असा निर्वाळा पक्षीमित्र तथा निसर्ग अभ्यासक संजय गुरव यांनी दिला आहे.