विदर्भातील शेतकऱ्यांचा 'तारफुली पॅटर्न
X
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडतो आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी खूश आहे. अमरावती, नागपूर, वर्धा या ठिकाणी बराच पाऊस झाला आहे आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मालधुर या गावी गेल्या ५-६ दिवसांन पासून पाऊस दररोज त्याची हजेरी लावत आहे. शेतकरी आता मशागतीला लागले आहेत.
या ८० कुटुंबांच्या छोट्याश्या गावात शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्या शेती करत आहेत. मात्र आता बदलत्या काळानुसार
वाटण्या झाल्याने शेतीचे क्षेत्र छोटे झाले आहे. त्यामुळे बैलजोडी घेणेही अनेक लोक टाळत आहेत. त्यामुळे या गावातील लोकांनी तारफुली पॅटर्न निर्माण केला आहे.
तूर, कपाशी, सोयाबीन, हकभरा, गहू, भुईमुग इ. पिकांचे विदर्भात पीक घेतले जाते. सोयाबीन, तूर, कपाशी हे प्रमुख पीक आहे आणि तूर, कपाशीची मशागत किंवा लागवड करताना तारफुली ही पद्धत वापरली जाते
तारफुली आहे तरी नेमके काय...?
तारफुली एक पीक लागवड करण्याची पद्धत आहे. आधी ज्यापद्धतीने २ बैलांच्या जोडीचा वापर व्हायचा. म्हणजेच बैलाची एक जोडी सरे फोडायची मग मागून मजूर बियाणे पेरायचे आणि मग दुसरी बैलांची जोडी त्यावर माती बुजवते. नेमक यात बैलांच्या दोन जोड्या आणि मजूर असा एकूण समावेश असतो. यात मजुरी खूप जात असल्याने आता तारफुली पॅटर्न या पद्धतीला फाटा देत असून योग्य ठरत आहे. यात एक एकराची लागवड अवघ्या ५०-६० मिनिट मध्ये पूर्ण होते.
यामध्ये २ मजूर हे शेताच्या दोन बाजूला तार ठेवतात. त्या तारेवर काही सारख्या अंतरावर कपड्याचे छोटे छोटे तुकडे बांधलेले असतात.मग जिथे जिथे कपड्याचे तुकडे असतात तिथे विळ्याच्या साह्याने उकरून त्यात बियाणे टाकून त्याच विळ्याने बुजवून टाकतात.
काय आहे हा शेतकऱ्यांचा तारफुली पॅटर्न जाणून घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रणय ढोले यांनी..