हिरव्या मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल
X
चांदवड : हिरव्या मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याने चांदवड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. चांदवड तालुक्यातील उर्दुळ येथील शेतकरी दत्तू कारभारी ठाकरे यांनी उर्दुळ दहिवद रोडवरील शेतातील एक एकर हाकुनी व ओमिका जातीच्या मिरचीची लागवड केली होती. त्यासाठी रोप, पेपर मजुरी , खादी ड्रिंक, सुतळी बांधणी असा एकूण विक्री 94 हजार 900 रुपये खर्च केला होता. ही मिरची मालेगाव, लासलगाव येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी नेली असता मिरचीला अवघा एक रुपया किलोने भाव पुकारण्यात आला, यातून खर्चही निघत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने ती मिरची रस्त्यावरच फेकून देणे पसंत केले.
मिरचीला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या एक एकर क्षेत्रातील मिरचीची रोपे उपटून फेकून दिली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकर्यांनी जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. याकडे सरकारने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली शेतकरी दत्तू ठाकरे यांनी केली आहे.