Video: शेतकरी आंदोलन अधिक तीव्र, २० शेतकऱ्यांच आमरण उपोषण
X
तीन नवीन शेतकरी सुधारणा कायद्यासंदर्भात शेतक-यांनी सरकारचा निषेध म्हणून दिल्ली आग्रा हायवे, दिल्ली जयपूर हायवे येथे रस्ता अडवला होता. निषेध म्हणून १२ डिंसेबर ला टोलनाक्यावर टोल न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अदानी अंबानी या उद्योगपतींच्या कारखान्यात तयार होणा-या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला होता.
मात्र, शेतक-यांनी या पुढे जात आता अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केले आहे. गेल्या ३ दिवसांपासून शेतक-यांच दिल्ली सिंधू बाॅर्डर वर उपोषण सुरु आहे. पहिल्या दिवशी फक्त ५ शेतकरी उपोषण करत होते. आज मात्र २० शेतकरी उपोषण करत आहेत. त्यातील एका शेतक-याची तब्येत खराब झाली आहे.
या संदर्भात उपोषणकर्ते शेतकरी जग्तार सिंह दिंडसा यांच्याशी बातचीत केली असता... जोपर्यंत हे तीन काळे कायदे परत घेतले जात नाहीत. तोपर्यंत उपोषण परत घेतले जाणार नाही. असा इशारा या उपोषणकर्त्या शेतक-यांनी दिला आहे. तसेच हे कायदे जोपर्यंत परत घेतले जात नाही. तोपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक आमरण उपोषण करणार असल्याचं जग्तार सिंह यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं...