Home > मॅक्स किसान > MilkPrice: देशी दारूच्या क्वार्टर एवढी किंमत एक लिटर दुधाला द्या ; सदाभाऊ खोत

MilkPrice: देशी दारूच्या क्वार्टर एवढी किंमत एक लिटर दुधाला द्या ; सदाभाऊ खोत

Cow Milk Rate : आता बस झाले दूध उत्पादकाची परवड थांबवायची ुअसेल तर देशी दारू (Desi liquor) इतकाच रेट द्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे

MilkPrice: देशी दारूच्या क्वार्टर एवढी किंमत एक लिटर दुधाला द्या ; सदाभाऊ खोत
X

दूध दरावरून झालेली आंदोलनं महाराष्ट्राला नवीन नाहीत, दूध उत्पादकाची परवड थांबवण्यासाठी देशी दारूच्या क्वार्टरची किंमती इतका दर शेतकऱ्यांच्या दुधाला द्या, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे.




Sadabhau Khot Latest News :प्रमुख दूध संघाने पुन्हा एकदा दूध खरेदी दर घटवल्यानंतर रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे.उत्पादन खर्च सातत्याने वाढत असून दूध धंदा परवडत नाही. आता देशी दारूच्या क्वार्टरची किंमती इतका दर शेतकऱ्यांच्या दुधाला द्या, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे.





गायीच्या दुधाला ७५ तर म्हशीच्या दुधाला १२५ रुपये प्रतिलिटर दर देण्याची मागणी खोत यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी मेळावा नुकताच पार पडला. यावेळी खोत यांनी ही मागणी केली आहे.




राज्यात सध्या दुधाचे खरेदीदर घसरले आहेत. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या दूध दरासाठी सदाभाऊ खोत यांनी आता सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

खोत म्हणाले की, २२ मे रोजी दूध दराच्या प्रश्नावरून पुण्यामध्ये रयत क्रांती संघटनेने यात्रा काढली होती. याप्रश्नी दुग्धविकास मंत्र्यांनी बैठकही बोलावली आहे. या बैठकीत दुधाच्या दरासंबंधित प्रश्न मांडणार असल्याचे खोत म्हणाले. देशी दारूच्या एका बाटलीची किंमत जेवढी आहे. तेवढे पैसे आम्हला नको. देशी दारूच्या एका क्वार्टरची किंमत ९० रुपये आहे. तेवढेच पैसे शेतकऱ्याच्या दुधाला द्या, असे खोत यावेळी म्हणाले.

म्हशीच्या दुधाला १२५ रुपये दराची मागणी

खोत म्हणाले की, सर्वसाधारणपणे गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर ७५ रुपये दर आणि म्हशीच्या प्रतिलिटर दुधासाठी १२५ रुपयांचा दर मिळाला पाहिजे. दुधाचे दर वाढविल्यामुळे महगाई वाढणार नाही. शेतकऱ्यांना जर भाव दिला तर निश्चितपणे महागाई कमी होईल. कारण ज्यांना महागाईची झळ बसते ती माणसं शेतीत काम करण्यासाठी येतात. त्यामुळे शेतकरी त्यांनाही दोन पैसे देईल.

दरम्यान, दूध दराबाबत शिंदे सरकार सकारात्मक निर्णय घेईल का, असा प्रश्न विचारल्यानंतर जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचे भविष्य उज्वल असेल, असेही खोत यावेळी म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावं. पण तुम्ही जर शेतकऱ्यांना झिडकारलं तर त्याच शेतकऱ्याच्या हातात बळी नांगर आहे, हे राज्यकर्त्यांनी कधीही विसरू नये, असा निर्वाणीचा इशारा माजी मंत्री आणि राज्यातील महायुतीचे समर्थक सदाभाऊ खोत यांनी शेवटी दिला.




"देशी दारूच्या एका बाटलीची किंमत जेवढी आहे. तेवढे पैसे आम्हला नको. देशी दारूच्या एका क्वार्टरची किंमत ९० रुपये आहे. तेवढेच पैसे शेतकऱ्याच्या दुधाला द्या"

- सदाभाऊ खोत, माजी मंत्री आणि अध्यक्ष रयत क्रांती संघटना


Updated : 20 Jun 2023 6:14 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top