पिकांच्या निंदनीच्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त
X
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा परिसरातील शेती मशागतीची कामे रखडली होती. पावसामुळे पिकांमध्ये तणावाचे प्रमाण वाढले होते.आता गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दिवस उजाडला की शेतकरी मशागतीची काम करीत आहे. योग्य वेळी योग्य ती मशागत झाली तर पिकांची वाढ झपाट्याने होणार आहे. त्यामुळे रखडलेली कामे आणि उत्पादनवाढीच्या अनुशंगाने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मिळालेल्या वेळेत कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
सध्या शेतकऱ्यांचा भर पिकांमध्ये वाढलेल्या तण काढण्यासाठी शेतकरी राजा व्यस्त दिसून येत आहेत. यामुळे निंदनीच्या कामांना गती मिळाली आहे. पिकामध्ये असलेल्या तणामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो.त्यामुळे परिसरात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांना वेग आला असून, कपाशी,मका,बाजरी, सोयाबीन निंदनीची लगबग सुरू आहे. लवकर काम उरकावे यासाठी काही शेतकरी मजुर लावुन शेतीचे काम करीत आहेत, असे स्थानिक शेतकरी विश्वास पाटील यांनी सांगितले.