Home > मॅक्स किसान > नंदूरबारचे शेतकरी करतात रोज 500 मेट्रिक टन केळीची निर्यात....

नंदूरबारचे शेतकरी करतात रोज 500 मेट्रिक टन केळीची निर्यात....

केळीचे(banana) माहेरघर असलेल्या जळगाव (Jalgaon)नंतर केळी उत्पादनात नंदूरबार (nandurbar)जिल्ह्याचा चा दुसरा नंबर लागतो.तेही निर्यातक्षम दर्जेदार केळीसाठी. दररोज 500 मेट्रिक टन केळी सातासमुद्रापार पोहोचवली जाते. गुणवत्तापूर्ण असलेल्या केळीला विविध देशांतून मागणी असून मुंबईतून जहाजाने दुबईला पाठविली जातात. तेथून ती इराक, इराण, ओमेन अशा दहा ते बारा देशांत निर्यात केली जातात. एका दिवसात तब्बल 500 मॅट्रिक टन केळी विदेशात पाठविण्यात येत असून सुमारे दीड कोटीची उलाढाल एका दिवसात होत असते, पहा प्रतिनिधी संतोष सोनवणे यांचा ग्राऊंड रिपोर्ट..

नंदूरबारचे  शेतकरी करतात रोज 500 मेट्रिक टन केळीची निर्यात....
X

केळीचे माहेरघर असलेल्या जळगाव नंतर केळी उत्पादनात नंदूरबार जिल्ह्याचा चा दुसरा नंबर लागतो.तेही निर्यातक्षम दर्जेदार केळीसाठी. दररोज 500 मेट्रिक टन केळी सातासमुद्रापार पोहोचवली जाते. गुणवत्तापूर्ण असलेल्या केळीला विविध देशांतून मागणी असून मुंबईतून जहाजाने दुबईला पाठविली जातात. तेथून ती इराक, इराण, ओमेन अशा दहा ते बारा देशांत निर्यात केली जातात. एका दिवसात तब्बल 500 मॅट्रिक टन केळी विदेशात पाठविण्यात येत असून सुमारे दीड कोटी ची उलाढाल एका दिवसात होत असते.





नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार हे तीन तालुके केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यात शहादा येथील विविध जातीचे वाण आजघडीला बाजारात चांगलेच नावारुपाला आले आहे. आकाराने मोठी, लांब आणि चवीला गोड असणाऱ्या या केळीला भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर आखाती देशात केळी एक्स्पोर्ट केली जाते. एका महिन्यात शहादा येथील व्यापाऱ्यांच्या मदतीने तब्बल 15 हजार टन केळी विदेशात पाठविल जाणार आहे. या पॅकिंग केलेल्या केळीला सध्या स्थानिक बाजार भावाहून अधिकचा भाव मिळत आहे, असे शहाद्याचे केळी व्यापारी अनिल पाटील यांनी सांगितले.




शशिकांत पाटील हे एक केळी उत्पादन शेतकरी असून त्यांनी आपल्या जवळ असलेल्या 7 एकर जमिनीपैकी निम्मे जमिनीवर केळी लागवट केली आहे. केळीच्या एका झाडाला त्याना 60 ते 80 रुपये खर्च त्याना आला होता, यंदा भारतीय बाजारात तसच विदेशातही केळीला चांगला भाव आहे. केळी पीक दर्जेदार आणि निर्यातक्षम असल्याने स्थानिक बाजार भावापेक्षा 500 रुपये अधिकचा दर मिळत असल्याने ते समाधान व्यक्त करत आहे, असे शहाद्याचे केळी उत्पादक शेतकरी शशिकांत पाटील यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार या तालुका परिसरातील गुणवत्तापूर्ण केळीची निवड केली जाते.सर्वप्रथ केळीच्या घडापासून फण्या वेगवेगळ्या करून त्याला बुरशीनाशक औषधामध्ये धुऊन घेतले जाते.नंतर त्यांचे वजन करून विशिष्ट प्रकारच्या फोम मध्ये पॅक केले जाते त्यानंतर कॅरेटमध्ये त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून कंटेनर हे मुंबईला पाठविण्यात येतात. मुंबईत जेएनपीटीमध्ये प्रि-कुलिंग करून कोल्डस्टोअरेजच्या माध्यमातून जहाजाने ते दुबईला पाठविण्यात येतात. दुबईतून बाकी देशांना केळीची निर्यात होते.

विशेष म्हणजे केळीच्या निर्यातीसाठी केंद्र आणि राज्य शासनाची कुठलीही मदत अथवा मार्गदर्शन या शेतकऱ्यांना लाभलेले नाही केवळ स्वतःच्या हिम्मतीवर आणि मेहनतीवर या शेतकऱ्यानी खाजगी कंपनीच्या सहकार्याने केळीची निर्यात करीत आहेत.

Updated : 11 April 2023 5:44 AM IST
Next Story
Share it
Top