Home > मॅक्स किसान > #Agriculture आता शेतीमधे ड्रोनचा वापर होणार..

#Agriculture आता शेतीमधे ड्रोनचा वापर होणार..

संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच आता ड्रोनचा वापर शेतीसाठी ड्रोनच्या वापरावर शिक्कामोर्तब झालं आहे. शेतीची फवारणी आणि सर्वेक्षणासाठी ड्रोनचा बाईकवरुन वापरण्याचे प्रात्यक्षिक नुकत्याच दिल्लीमधे पार पडलेल्या ड्रोन महोत्सवात सादरीकरण करण्यात आलं आहे.

#Agriculture आता शेतीमधे ड्रोनचा वापर होणार..
X


आयओ टेकवर्ल्ड एव्हीगेशन (IoTechWorld Avigation), भारतातील डीजीसीए(DGCA) मान्यताप्राप्त ड्रोन उत्पादक कंपनी याच नि्मित्ताने दरमहा एक हजार(1000) ड्रोनची उत्पादनाची तयारी केली आहे. या कंपनीने भारतातील पहिली कृषी ड्रोन सेवा ऍप्लिकेशन अॅग्रीनेट ("AGRINET") सुरू केले असून नुकत्याच प्रगती मैदान नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ड्रोन महोत्सव-2022 मध्ये हे ऍप्लिकेशनसह सादरीकरण केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

अॅग्रीनेट ("AGRINET") ड्रोन शेतकरी आणि ड्रोन पुरवठादारांना एकत्र करणार असून अॅग्रीनेट (Agrinet) द्वारे, शेतकरी फवारणी करू शकतात. ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी नोंदणी, ड्रोनशी संबंधित माहिती इत्यादीसाठी कृषी आवश्यकतांसाठी ड्रोन भाड्याने घेऊ शकतात. अॅग्रीनेट (Agrinet) च्या मदतीने ड्रोन मालक कृषीउद्योजक बनू शकतात. ड्रोनची सेवा देणे तसेच ही सेवा प्रदान करणारे प्रदाता म्हणून शेतकरी स्वतःची नोंदणी करू शकतात, असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. (AGRINET) व्यतिरिक्त,आयओटेक( IoTech) ने त्यांच्या कृषी ड्रोन अॅग्रोबॉट (Agribot) चे नवीन पोर्टेबल मॉडेलही याच कार्यक्रमादरम्यान लाँच केले आहे. पिकांच्या आरोग्याचा अंदाज घेऊन सोल्यूशन फवारणीसाठीसाठी अॅग्रोबॉट बाईकवर शेतात नेले जाऊ शकते जे सामान्यतः पिकांना त्रास देणारे कीटक आणि रोग ओळखण्यासाठी AI चा वापर करते आणि जलद आणि अचूक उपाय आणि फवारणी सुचवते. यासह पीकऔषध, विशिष्ट जमीन मोजणीही करता येते.




"ड्रोन्स शेतकर्‍यांना केवळ उत्पादन वाढविण्याबरोबरच खर्च कमी करुन मोठ्या क्षेत्रांचे सर्वेक्षण करते. ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप करणे कठीण होते त्याठिकाणी या सिस्टिमचा उपयोग होतो" एकीकडे, अॅग्रीनेट लॉन्च करून आम्ही शेतकर्‍यांना ड्रोन विश्वात नेण्यास मदत करत आहोत, तर दुसरीकडे, अॅग्रीनेट ( AGRINET )सह, आम्ही लहान आणि मध्यम आकाराच्या शेतकर्‍यांना हाय-एंड ड्रोन तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी एक इकोसिस्टम सादर करत आहोत. असे कंपनीचे सहसंस्थापक अनूप उपाध्याय यांनी सांगितले. ,

Updated : 30 May 2022 6:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top