Home > मॅक्स किसान > परदेशात पिकणारे ड्रॅगन फ्रुट महाराष्ट्रभर

परदेशात पिकणारे ड्रॅगन फ्रुट महाराष्ट्रभर

परदेशात पिकणारे ड्रॅगन फ्रुट महाराष्ट्रभर
X

व्हिएतनाम, चीन सारख्या देशात फळास येणारे ड्रॅगन फ्रुट सध्या महाराष्ट्रभर पसरले आहे. यात उस्मानाबाद तालुक्यातील जागजीच्या सावंत बंधुंचा खारीपेक्षाही मोठा वाटा आहे. आयुर्वेदिक दृष्ट्या महत्वपुर्ण असलेले निवडूंगाची सुधारित जात म्हणजे ड्रॅगन. जागजीचे नितीन सावंत शिक्षक म्हणुन साताऱ्यात असतात. तिथला प्रयोग पाहुन त्यांनी किमान २५ वर्ष फळ देणारे व एकदाच खर्च करावे लागणारे पीक ड्रॅगन आपल्या भागात कसे येईल हे बघितले. दीड एकरातील पीक जोपासनीला भावांनी मदत केली. उत्पन्न चांगले मिळते म्हणून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना ही शेती करण्यास मदत केली. स्वतःच्या शेतीत पुन्हा प्रयोग करत जम्बो, वेगवेगळ्या रंगाच्या ड्रॅगन फळाचे प्रयोग केले. आज त्यांच्या जम्बो ड्रॅगनचा माल बाजारात जात असून जुनी बागही कायम आहे. त्यांनी पुढे सफरचंद, खजूरचाही प्रयोग आपल्या शेतीत घेतला आहे.

पहा आणि समजून घ्या शेतकरी

तानाजी सावंत यांचा आगळावेगळा प्रयोग...


Updated : 23 Aug 2023 7:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top