Home > मॅक्स किसान > शेतीचा पॅटर्न बदलला: एरंडी हरभऱ्यातून भरघोस उत्पन्न

शेतीचा पॅटर्न बदलला: एरंडी हरभऱ्यातून भरघोस उत्पन्न

एका शेतकऱ्याने एरंडाची आणि त्यामध्ये हरभऱ्याची आंतर पिकाची शेती केलीय. सहा महिन्याच्या या दोन्ही पिकांमध्ये या शेतकऱ्याला एका एकरामध्ये एक लाख 40 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे...

शेतीचा पॅटर्न बदलला: एरंडी हरभऱ्यातून भरघोस उत्पन्न
X

बारामतीच्या परिसरातील शेती ही प्रामुख्याने उसाचा पट्टा गेल्या अनेक वर्षापासून प्रचलित आहे. परंतु यावर्षी पहिल्यांदाच एका शेतकऱ्याने एरंडाची आणि त्यामध्ये हरभऱ्याची आंतर पिकाची शेती केलीय. सहा महिन्याच्या या दोन्ही पिकांमध्ये या शेतकऱ्याला एका एकरामध्ये एक लाख 40 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. पहा बारामतीवरुन जितेंद्र जाधव यांच्या ग्राऊंड रिपोर्ट...


दत्तात्रय देवकाते यांनी माळेगाव येथील त्यांच्या एक एकर शेतीमध्ये गुजरात विद्यापीठाने प्रसारित केलेले एरंडाचे बियाणे लावले. तर जोडीला विक्रांत जातीचे हरभरा बियाणे लावून त्यांनी आंतरपीक घेतले. या दोन्ही पिकाची उत्तम प्रकारे वाढ झाली मशागत करताना कोणतेही रासायनिक खत न वापरता त्यांनी होमिओपॅथिक औषधे वापरली दरम्यान एरंडाचा पहिला भाग त्यांना तीन क्विंटलचा मिळाला तर दुसरा भार 12 क्विंटलचा मिळाला आहे.

हरभऱ्याच्या आंतर पिकामध्ये त्यांना आठ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन मिळाले आहे. एरंड पिकाचे उत्पादन घेण्यासाठी त्यांना बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची मोठी मदत झाली. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हे पीक यशस्वी घेतल्याचं देवकाते सांगतात.

Updated : 21 May 2023 4:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top