Home > मॅक्स किसान > धुर्‍याला धुरा असताना पिक विमा का मिळत नाही? पिक विम्यावरून विधानसभेत पुन्हा खडाजंगी

धुर्‍याला धुरा असताना पिक विमा का मिळत नाही? पिक विम्यावरून विधानसभेत पुन्हा खडाजंगी

पिक विमा वरून आज पुन्हा एकदा विधानसभेत खडाजंगी झालीपीक नुकसानीची माहिती कळविण्याची मुदत 72 तासांवरून वाढवुन 92 तासांपर्यंत करण्यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली.

धुर्‍याला धुरा असताना पिक विमा का मिळत नाही? पिक विम्यावरून विधानसभेत पुन्हा खडाजंगी
X

मु बुलढाणा जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर सुमारे 3 लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले होते, मात्र पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीच्या नियमानुसार 72 तासांच्या आत न कळवल्याने किंवा अन्य कारणांनी सुमरे 11 हजार शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही, किंवा अत्यंत त्रोटक विमा रक्कम मिळाली. याबाबत संपूर्ण नुकसानीच्या अहवालाची फेरतपासणी करण्यात येईल, असे आश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत बोलताना दिले.

बुलढाणा जिल्ह्यातील थकीत तसेच चुकीचा पीकविमा मिळाल्याच्या विषयी आ.श्वेताताई महाले यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात धनंजय मुंडे बोलत होते.

यावेळी धनंजय मुंडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांनी भरलेला विमा हफ्ता, त्यांना मिळालेली रक्कम आदी आकडेवारी सभागृहात मांडली. त्याचबरोबर संबंधित 11 हजार शेतकऱ्यांना चुकीचा कमी विमा मिळाला किंवा मिळालाच नाही, याबाबत फेरतपासणी करण्याचे निर्देश विभागाला दिले असल्याचे जाहीर केले.

राज्यात यावर्षी शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची सुविधा राज्य सरकारने निर्माण केली असून याद्वारे आजपर्यंत 1 कोटी 14 लाख शेतकऱ्यांनी आपला विमा भरला असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी सभागृहात दिली.

शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर अतिवृष्टी, पूरपरिस्थिती अशा आपत्कालीन काळात शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमानुसार 72 तासांच्या आत त्यांची ऑनलाइन तक्रार करणे बऱ्याचदा जिकिरीचे ठरते. त्यामुळे ही वेळ वाढवून द्यावी, असे अनेक लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, अनेक काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मीही लढलेलो आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीला ऑनलाइन तक्रार करण्याचा अवधी 72 तासांवरून वाढवून किमान 92 तास इतका देण्यात यावा, याबाबत आपण केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सदनाला सांगितले.


Updated : 27 July 2023 3:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top